बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडीतील उमराणी गावचा रहिवासी असलेल्या श्रीमंत इत्नाळेचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. त्याला ठार मारून त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे करण्यात आले होते. श्रीमंतची बायको सावित्री हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता तिने बाहेरच्या कोणीतरी हा खून केला असावा असे सांगितले. मात्र पोलिसांना तिच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांनी तिची कसून चौकशी केली असता आपणच नवऱ्याचा खून केल्याचे तिने कबूल केले, मात्र खून करण्यामागची तिने कारणे सांगितले तेव्हा पोलीसही हादरले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दारूचे व्यसन, बाईकची मागणी
सावित्रीने पोलिसांना सांगितले की तिच्या नवऱ्याला दारूचे व्यसन होते आणि तो सावित्रीला दारूच्या पैशांसाठी सतत त्रास देत होता. श्रीमंत आणि सावित्रीची रोज भांडणे होत होती. दारूसाठी पैसे दिले नाही तर सावित्रीला बेदम मारहाण केली जात होती. एकेदिवशी श्रीमंतने सावित्रीच्या मागे आपल्याला बाईक विकत घेऊन दे असा तगादा लावला होता. सतत वाढत जाणारी पैशांची मागणी पाहून सावित्री कंटाळली होती.
नक्की वाचा : बीड पोलीस स्टेशनबाहेरील ते 5 पलंग कोणासाठी?
पैशांसाठी पत्नीवर शरीरविक्रय करण्याची जबरदस्ती
दारूच्या आहारी गेलेल्या श्रीमंतने आपली बायको पैसे देत नाही हे पाहून तिच्यावर शरीरविक्रय करण्याची जबरदस्ती केली. पैशांसाठी त्याने सावित्रीला परपुरुषांसोबत संबंध ठेवायला भाग पाडले. घर तुटू नये यासाठी सावित्रीने हेदेखील सहन केले मात्र एक घटना घडली ज्यामुळे सावित्री जबरदस्त हादरली होती, या घटनेमुळे तिच्या संतापाचा कडेलोट झाला.
नक्की वाचा :बंद खोलीत माय-लेकाचा मृतदेह, नागपुरनंतर मुंबई हादरली; परिसरात खळबळ
मुलीवर बलात्काराचा प्रयत्न
दिवसरात्र दारू पिणारा श्रीमंत बेभान झाला होता. त्याने एकेदिवशी पोटच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने कसाबसा स्वत:चा बचाव केला. सावित्रीला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा ती संतापाने पेटून उठली तिने श्रीमंतवर हल्ला केला आणि श्रीमंत मरेपर्यंत त्याला मारत राहिली. नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर सावित्रीने त्याच्या शरीराचे तुकडे केले आणि शेतात फेकून दिले. सावित्रीने मुलीला घडलेल्या प्रकाराबद्दल कुठेही वाच्यता करू नकोस असे सांगितले. सावित्रीने घरातील रक्ताचे डाग पुसून टाकले आणि हत्येसाठी वापरलेलं हत्यारही गायब करण्याचा प्रयत्न केला. शेतामध्ये पडलेला श्रीमंतचा मृतदेह गावकऱ्यांना दिसला होता.