KDMC Drugs Racket: कल्याण- डोंबिवली हा ड्रग्ज तस्करांचा अड्डा बनला आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. डोंबिलीतला पलावा सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेलं ड्रग्ज तस्करीचं रॅकेट पोलिसांनी नुकतंच उद्धवस्त केलं. हे प्रकरण अद्याप ताजे आहे. त्याचवेळी डोंबिवलीजवळच्या निळजे भागातून 2 कोटींचे ड्रग्ज पोलिसांनी अटक केलीय. या प्रकरणात पोलिसांनी एका विदेशी नागरिकाला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
मानपाडा पोलिसांनी डोंबिवली जवळच्या निळजे गावातील व्हर्टेक्स विला या इमारतीतील एका घरात छापा टाकला. या घरात पश्चिम आफ्रिकेतील आयवरी कोस्ट या देशातील इसा बकायोका या नागरिकाला अटक केली आहे. त्याच्या घरात जवळपास दीड किलो वजनाचे एमटी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 2 कोटी 12 लाख इतकी आहे.
( नक्की वाचा: Dombivli : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले )
इसा हा नवी मंबईत राहत होता. त्याठिकाणाहून त्याने त्याचे बस्तान निळजे गावात हलविले होते. त्याने हे ड्रग्ज कुठून आणले? तो हे कुणाला पोहोचवत होता? याचा पोलीस तपास करत आहेत. काही दिवसापूर्वीच लोढा परिसरातील डाऊन टाऊन या सोसायटीत पोलिसांनी छापा टाकून ड्रग्ज हस्तगत केले होतेे. त्या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.
या दोन्ही गुन्ह्यात पोलिसांचा तपास सुरु आहे. आणखीन काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे. मात्र कल्याण ग्रामीणमधील 27 गावातील काही परिसरात ज्या प्रकारे ड्रग्ज पकडले गेले आहे. अखेर हे परिसर का निवडले जात आहेत. खरेदी करणारे लाेक कोण आहेत? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.
( नक्की वाचा: Dombivli: डोंबिवलीच्या ड्रग्ज तस्करीचा मोहरक्या सापडला! कार डिलर्सच्या परदेशीवारीचं रहस्य उलगडणार )
या सर्व प्रकरणाचा शोध सुरु असून पोलीस संबंधितांना गजाआड करतील असा विश्वास कल्याण पोलिस परिमंडळ -3 चे डीपीसी अतुल झेंडे यांनी व्यक्त केला आहे.