Ramesh Mhatre Old Video Viral : कल्याण-डोंबिवलीत सोशल मीडियावर शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये रमेश म्हात्रे हे केडीएमसीच्या सुरक्षारक्षकांशी वाद घालताना आणि महापालिका मुख्यालयात गोंधळ घालताना दिसत असल्याच्या चर्चा इंटरनेटवर रंगल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात पुन्हा विविध चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान,डॉक्टर मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेले रमेश म्हात्रे यांच्यावर सध्या ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांकडून त्यांना आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रमेश म्हात्रेसोबत कोणते पदाधिकारी होते?
कल्याण न्यायालयाने पोलिसांना स्पष्ट केले आहे की,रमेश म्हात्रे न्यायालयासमोर प्रत्यक्ष हजर झाल्यानंतरच या प्रकरणातील पुढील सुनावणी होईल.त्यामुळे आता त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रमेश म्हात्रे यांच्यासह शिवसेना नगरसेवक राजेंद्र देवळेकर,राजेश मोरे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते केडीएमसी मुख्यालयात आंदोलन करताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ 2017 चा असल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा >> FIFA World Cup 2026: 'गोल्डन बूट' कोण जिंकणार? रेसमध्ये कोणकोण? पाहा सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंची लिस्ट
सुरक्षारक्षकांसोबत मोठा वाद झाला होता
सूत्रांच्या माहितीनुसार,तत्कालीन स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे आणि इतर शिवसेना नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाच्या कामकाजाविरोधात आंदोलन केले होते.या आंदोलनादरम्यान आयुक्तांच्या दालनाबाहेर गोंधळ झाल्याचा आरोप असून,रमेश म्हात्रे यांनी खुर्ची उचलणे तसेच दालनाचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याच्या प्रयत्न करताना दिसत आहे तसेच सुरक्षा रक्षकांसोबत त्यांची झटापटी देखील सुरू आहे.
— Naresh Shende (@NareshShen87640) July 9, 2026
नक्की वाचा >> Ratnagiri News: सातारा-रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या 'या' घाटात भूस्खलन, रस्ता दरीत गेला वाहून, वाहतूक ठप्प
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात रमेश म्हात्रे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि डॉक्टर मारहाण प्रकरण यांची सांगड घालून विविध चर्चा सुरू असल्या,तरी संबंधित व्हिडिओ 2017 मधील असल्याचा दावा करण्यात येत असून,त्याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world