जाहिरात

Ratnagiri News: सातारा-रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या 'या' घाटात भूस्खलन, रस्ता दरीत गेला वाहून, वाहतूक ठप्प

 रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'रघुवीर घाटात'ढगफुटीसदृश पावसामुळे भीषण भूस्खलनाची घटना घडली आहे.

Ratnagiri News: सातारा-रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या 'या' घाटात भूस्खलन, रस्ता दरीत गेला वाहून, वाहतूक ठप्प
Ratnagiri Raghuveer Ghat landslide News

राकेश गुडेकर, प्रतिनिधी 

Ratnagiri Raghuveer Ghat Land Slide : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या 'रघुवीर घाटात'ढगफुटीसदृश पावसामुळे भीषण भूस्खलनाची घटना घडली आहे.या नैसर्गिक आपत्तीमुळे महामार्गाची एक बाजू पूर्णपणे खचून दरीत वाहून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे.या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यातील जवळपास 15 गावांचा संपर्क तुटला आहे.

रघुवीर घाटातील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने घटनास्थळी धाव घेत जेसीबी आणि अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.मात्र,रस्त्याचा मोठा भागच वाहून गेल्याने हा मार्ग पूर्ववत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नक्की वाचा >> Akola News : एकाच विद्यार्थिनीला मिळाले दोन वेगवेगळे पर्सेंटाईल, सीएमकडे MHT-CET स्कोअरकार्डच्या चौकशीची मागणी

मोठा अनर्थ घडू शकतो

बुधवारी रात्री रघुवीर घाटातील भूस्खलनाचा थरारक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला.असे असतानाही,मोठ्या प्रमाणावर पर्यटक 'वर्षा पर्यटनासाठी'धोकादायक वळणांवर गर्दी करत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.या पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नक्की वाचा >> Latur News: लातूरमध्ये शाळकरी मुलींचा कोण करतोय पाठलाग? एका धक्कादायक घटनेमुळं पालकांची धडधड वाढली

स्थानिकांची मागणी आणि प्रशासनाचे आवाहन

स्थानिक नागरिकांनी या गंभीर परिस्थितीची दखल घेत,पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रघुवीर घाटातील धोकादायक परिसरात तातडीने पर्यटनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.दरम्यान,प्रशासनाने या मार्गावरील प्रवास सध्या पूर्णपणे टाळण्याचे आवाहन केले असून केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.सध्या तरी या घाटातून प्रवास करणे जिवावर बेतू शकते,त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com