रंजिनी आणि तीच्या 17 दिवसांच्या नवजात जुळ्या मुलींची हत्या करण्यात आली होती. 2006 साली ही हत्या करण्यात आली. मात्र त्यांच्या हत्याऱ्यांना पकडण्यात आलं नाही. या घटनेला 18 वर्षे झाली आहे. आता 18 वर्षानंतर सीबीआयसा या हत्येतील आरोपींना अटक करण्यात यश मिळालं आहे. अंगावर काटा आणणारं हे तिहेरी हत्याकांड 10 फेब्रुवारी 2006 साली घडलं होतं. रंजिनी आणि तिच्या जुळ्या मुली केरळच्या कोल्लम जिल्ह्यात एका भाड्याच्या घरात राहात होत्या. तिथेच त्यांची हत्या करण्यात आली. ज्या वेळी रंजिनी आणि तिच्या मुलींची हत्या झाली त्यावेळी तिची आई पंचायत कार्यालयात जुळ्या मुलींच्या जन्माचं प्रमाणपत्र आणण्यासाठी गेली होती. आई ज्या वेळी घरी आली त्यावेळी त्यांनी तिघींचा मृतदेह घरी पाहीला. त्यांना या हत्येने जोरदार धक्का बसला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या हत्येची तपास सुरू झाला. त्यात रंजिनी आणि दिबिल कुमार बी याचे प्रेम संबध होते. त्यावेळी तो 28 वर्षाचा होता. शिवाय पठाणकोट इथं तो भारतीय सैनात रुजू होता. दिबिल कुमार बी आणि रंजिनी यांनी लग्न केले नव्हते. ते लिव्ह इन मध्ये होते. त्याच वेळी 24 जानेवारी 2006 साली रंजिनीला जुळ्या मुली झाल्या. त्यानंतर दिबिल तिच्यापासून दुर राहू लागला. तो तिला सतत टाळत होता. ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच असा वागत असल्याने रंजिनीला मोठा धक्क बसला. विवाह झाला नसतानाही दोन मुली पदरात होत्या. अशा वेळी तिला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
तिच्या आईने या विरोधात लढा देण्याचे ठरवले. त्यांनी केरळ राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. झालेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर आयोगानेही ती मुलं दिबिल कुमार याची आहेत की नाही हे तापासण्यासाठी टेस्ट करण्याचे आदेश दिले. हे आदेश दिल्यानंतर दिबिल कुमार हा चिडला. त्याला प्रचंड राग आला. त्यानंतर त्याने रंजिनी आणि तिच्या दोन्ही नवजात मुलींना संपवण्याचा कट रचला. या कटात त्याने सैन्यातीलच आपल्या मित्राला सहभागी करून घेतले.
ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar: 'माझीच मला लाज वाटते' अजित पवार असं का म्हणाले?
दिबिल कुमार बरोबर त्यावेळी सैन्यात राजेश पी हा देखील होता. त्यावेळी त्याचे वय 33 वर्ष होते. याने कटाचा भाग म्हणून त्यावेळी रंजिनी आणि तिच्या आई बरोबर मैत्री केली. त्यानंतर त्यांने दोघींनाही आपण दिबिलला रंजिनीसाठी लग्न करण्यासाठी तयार करू असं आश्वासन दिलं होतं. राजेशवर रंजिनी आणि तिच्या आईने विश्वास ठेवला. पण राजेश त्यांची हत्या कशी करता येईल या साठी दिबिलची मदत करत होता. याची थोडीही भनक या दोघींना लागली नाही.
कट रचून या दोघांनी मिळून रंजिनी आणि तिच्या दोन्ही नवजात मुलींची क्रुर पणे हत्या केली. हत्या केल्यानंतर लगेचच दिबिल कुमार आणि त्याच मित्र राजेश हे फरार झाले. त्यांचा काही पत्ता लागला नाही. मार्च 2006 मध्ये त्यांना भारतीय सैन्याने फरार म्हणून घोषीत केले. स्थानिक पोलिसांनी या दोघांनी शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. शिवाय त्यांची माहिती देणाऱ्यांना दोन लाखाचे इनामही जाहीर केले. पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. शेवटी केरळ उच्च न्यायालयाने 2010 मध्ये हे प्रकरण सीबीआयला दिले. मात्र त्यावेळी सीबीआयलाही त्यांना पकडता आले नाही.
वर्षा मागून वर्ष निघून गेली. पाच, दहा, पंधरा वर्ष झाली तरी कुमार आणि राजेशचा काही पत्ता लागत नव्हता. शेवटी सीबीआयला 18 वर्षांनंतर त्यांच्याबाबत माहिती मिळाली. ते दोघे ही नाव बदलून पुडुचेरीमध्ये राहत होते. त्यांनी आधार कार्ड बरोबर अन्य खोटी कागदपत्र तयार केली होती. ऐवढचं नाही तर त्यांनी तिथेच दोन शिक्षिकांबरोबर लग्न केलं होतं. त्यांना मुलंही होती. चेन्नईच्या सीबीआय टीमने या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना कोच्चीला आणले गेले. तिथे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. अशा प्रकारे 18 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यात यश आले. 18 जानेवारीपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.