जाहिरात

Manoj Jarange Patil: धनंजय मुंडेंना समज द्या, तो आवरला नाही तर... मनोज जरांगेंचा मोठा इशारा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. पुण्यामध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 

Manoj Jarange Patil: धनंजय मुंडेंना समज द्या, तो आवरला नाही तर... मनोज जरांगेंचा मोठा इशारा

 रेवती हिंगवे, पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या धनंजय मुंडेंना समज द्यावी.  तो आवरला नाही तर आम्हीही आवरणार नाही. आम्हाला जातीय तेढ करायची नाही. पण सुरुवात त्यांनी केली आहे, त्यांना थांबवा, असे म्हणत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे. पुण्यामध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील? 

'धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला गेले होते.तिथे त्यांना धमकी देण्यात आली. त्यांचाच भाऊ मारुन  त्यांना धमकी देणार असाल तर आमचा नाईलाज आहे. संतोष देशमुख यांची क्रुरपणे हत्या करुनही धनंजय मुंडेचे  पोट भरले नसेल आणि धनंजय मुंडेंना जर हेच घडवून आणायचं असेल तर आता आमचा मराठ्यांचा नाईलाज आहे,' असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

तसेच' संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना ज्यांच्यावर संशय आहे ते पोलीस एसआयटीमध्ये नको आहेत.  देवेंद्र फडणवीस यांना आमची मागणी आहे. तुम्ही न्याय देणार म्हणाल्यामुळेच मराठा समाज शांत आहे. सर्व आरोपींना फाशी देऊन दिलेला शब्द पाळावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या धनंजय मुंडेंना समज द्या.  तो आवरला नाही तर आम्हीही आवरणार नाही. आम्हाला जातीय तेढ करायची नाही. पण सुरुवात त्यांनी केली आहे, त्यांना थांबवा..' अशी मागणी त्यांनी केली. 

नक्की वाचा -  Santosh Deshmukh Murder : ही 10 जण लावणार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा छडा, कशी आहे SIT?

'धनंजय मुंडे फक्त तुमच्याकडेच वस्ताद नाहीत, आमच्याकडे वस्ताद आहेत. वेळेवर शहाणे व्हा, तुमच्या नेत्यांना समज द्या. तुम्हाला हे संपवतील. इतकी क्रुर हत्या होऊनही या लोकांना पोसणार आहात का? संतोष भैय्याच्या हत्येनंतरही प्रतिमोर्चांची धमकी देण्यास सांगता, अजून पोट भरली नाही का? कुठे न्यायचा आहे महाराष्ट्र,  हाताबाहेर जाण्याआधी हा खेळ थांबवा.. असंही मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com