Ketal Agarwal Viral Video : पुण्याच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अशातच केतनचा एक डान्स व्हिडीओ समोर आला आहे. हा त्याच्या कौंटुबीक कार्यक्रमाचा आहे. या व्हिडीओत केतन आनंदाने सिया गोयलच्या वडिलांसोबत डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.7 मे रोजी झालेल्या एका कौंटुबीक कार्यक्रमात परफॉर्म करणारी गायिका रितू शर्माने हा व्हिडीओ शेअर केला आहे.यामध्ये अग्रवाल आणि गोयल कुटुंब यांच्यातील नातेसंबंध चांगले असल्याचं समोर आलं आहे. रितू शर्माने एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं की,"मला दोन्ही कुटुबांमध्ये तणाव किंवा मतभेद असल्याचं जाणवलं नाही."
व्हायरल व्हिडीओत काय?
गायिका रितू शर्माने म्हटलंय की,हा व्हिडीओ केतनच्या कझनच्या लग्नाच्या इव्हेंटपूर्वीचा आहे.यावेळी नवरीचे मामा म्हणजेच केतनचे वडील विशाल आणि त्यांचं कुटुंब त्यांच्या बहिणीला गिफ्ट देत होते. यावेळी त्यांना या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी बोलावलं होतं. शर्माने सांगितलं की,केतन त्याच्या कुटुंबीयांसोबत पाहुणा म्हणून त्याच्या आत्याच्या घरी कार्यक्रमासाठी पोहोचला होता. सिया त्या कार्यक्रमात नव्हती.पण तिचे आई-वडिल तिथे उपस्थित होते.सर्व लोक नाचत होते.विशाल आणि केतन हे दोघेही खूप आनंदी वाटत होते. कुटुंबाचा हा तिसरा कार्यक्रम होता,ज्यामध्ये त्यांनी परफॉर्म केलं होतं. केतन प्रत्येक कार्यक्रमात सामील व्हायचा आणि सर्वांसोबत मिळून-मिसळून राहायचा. त्याने माझ्याकडे गाण्यासाठी विनंती सुद्धा केली होती.
अग्रवाल आणि गोयल कुटुंबाने केला एकत्र डान्स
गायिका रितू शर्माने मंगळवारी रात्री तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन व्हिडीओ शेअर केले.पहिल्या व्हिडीओ केतनचे वडील आणि सियाचे आई-वीडल-प्रवीण गोयल आणि पूजा गोयल इतर नातेवाईकांसोबत एकमेकांच्या जवळ उभे होते.केतनचे वडील गायिकेसोबत बॉलिवूडचं प्रसिद्ध गाणं "यम्मा यम्मा' गात होते. तर सर्व लोक "बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तूम कहाँ"या गाण्यावर थिरकत होते.हे दोन्ही व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world