Ketan murder Case:प्रत्यक्षदर्शी नाही, तरी 'पंचशील' टेस्टमधून आरोपीला कशी शिक्षा मिळणार? काय आहे हा सिद्धांत?

हत्येपूर्वी केतन आणि सियाचा पाठलाग करताना दिसलेला तोच हुडी घातलेला माणूस चेतन होता, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण म्हणजे गेट एनालिसिस केलं.

जाहिरात
Read Time: 3 mins

Ketan murder case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. सीया गोयल हिच्यावर केतन अग्रवाल याला लोहगडावरुन धक्का देऊन हत्या करण्याचा आरोप आहे. सीयाने तिचा कथित प्रेमी चेतन चौधरीसोबत मिळून हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान पोलीस आजही सीया आणि चेतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर पोहोचली. येथे पोलिसांनी आरोपींची चौकशी करीत क्राइम सीन रीक्रिएशन केलं. ३० जून रोजीही पोलीस दोन्ही आरोपींना घेऊन येथे आली होती. हत्येपूर्वी केतन आणि सियाचा पाठलाग करताना दिसलेला तोच हुडी घातलेला माणूस चेतन होता, हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण म्हणजे गेट एनालिसिस केलं.

कोर्टात केस सिद्ध करण्याचं आव्हान...

पोलीस अधिकारी आणि तज्ज्ञांनी सांगितलं की, न्यायालयात खटला सिद्ध करण्यासाठी या दोन्ही पायऱ्या खूप महत्त्वाच्या ठरतील, कारण खुनाचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. प्रतिकूल परिस्थिती पुराव्याच्या आधारे एखाद्याला दोषी ठरविण्यापूर्वी सरकारी वकिलांना १९८४ च्या ऐतिहासिक पंचशील निर्णयात सर्वोच्च न्यायालयाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. 

Advertisement

आरोपी चेतनला बुधवारी सकाळी ७.२५ वाजता पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाच्या कडक देखरेखीखाली लोहगडला नेण्यात आलं. तर सीयाला एक दिवस आधीच तिथं नेण्यात आलं होतं. तज्ज्ञांनी सांगितलं की, हत्या प्रकरणात आरोपीच्या उपस्थितीत घटनाक्रमाचं रिक्रिएशन केलं जाईल. यावरुन लक्षात येतं की, आरोपीने हत्या कशी केली, पीडित कुठे उभा होता, आरोपी त्याच्याजवळ कसा पोहोचला आणि हत्या कशी केली, या री-एनेक्टमेंटला व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि साक्षीदारांकडून रेकॉर्ड केले जाते. 

एका तज्ज्ञांनी सांगितलं की, गेट एनालिसिच्या माध्यमातून हत्येच्या दिवशी आरोपी घटनास्थळावर उपस्थित होता हे सिद्ध केलं जातं. आरोपीला त्या जागी नेलं जातं आणि त्याची चालण्याची पद्धत, चेहऱ्यावरील हावभाव, बॉडी लॅग्वेज, उंची आणि अवयवांच्या उंचीचा वैज्ञानिक रेकॉर्ड तयार केला जातो. त्यांनी सांगितलं की, आरोपी घटनास्थळावर उपस्थित होता हे यातून सिद्ध होतं त्यामुळे फॉरेन्सिक गेट एनालिसिसच्या रेकॉर्डला कोर्टात आव्हान देणं कठीण असतं. 


पंचशील सिद्धांत किंवा पंचशील तत्व काय आहे? l What is Panchsheel Test?

१९८४ च्या शरद बिरधी चंद सारडा विरुद्ध महाराष्ट्र राज्य प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की, हत्या प्रकरणात साक्षीदार नसल्यास आरोपीला निर्दोष मुक्त करता येणार नाही.

कोर्टाने सांगितलं की, अशा स्थितीत पुराव्यांच्या आधारावर आजन्म कारावास किंवा मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते. यासाठी कोर्टात पाच अत्यंत कडक अटी देण्यात आल्या आहे. ज्याला पाच गोल्डन सिद्धांत किंवा पंचशील नावाने ओळखले जातो. 

नक्की वाचा - Siya Goyal : केतन हत्याकांडात क्रॉस मॅरेजचा नवा अँगल; गोयल-अग्रवाल कुटुंबात एक नव्हे दोन लग्नांचा होता प्लान

काय आहेत या अटी?

१ आरोपीविरुद्ध सादर केलेली प्रत्येक परिस्थिती आणि तथ्य पूर्णपणे आणि खात्रीशीरपणे सिद्ध केले पाहिजे.

२ सर्व सिद्ध झालेले पुरावे केवळ आरोपीच्या गुन्हेगारीकडेच निर्देश करणारे असले पाहिजेत. ज्यामुळे इतर कोणाच्याही सहभागाबद्दल कोणतीही शंका शिल्लक राहणार नाही.

Advertisement

३ परिस्थिती आणि पुरावे पूर्णपणे ठोस, नक्की असायला हवेत, ज्याला नाकारता येणार नाही.

४ परिस्थिती अशी असायला हवी की, आरोपी निर्दोष असल्याच्या प्रत्येक तार्किक शक्यता पूर्णपणे संपते. 

५ पुरावा हा एक सलग आणि संपूर्ण साखळी स्वरूपात असायला हवा. ज्यातून केवळ हाच निष्कर्ष निघाला पाहिजे की गुन्हा केवळ आरोपीनेच केला आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातही लागू...

केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास आणि कायदेशीर कारवाई पूर्णपणे याच पाच सिद्धांतावर आधारित असेल. एका तज्ज्ञाने सांगितलं की, पोलिसांकडे घटनेचा कोणताही साक्षीदार नाही. यासाठी लोहगडमध्ये सीन रिक्रिएशन आणि गेट एनालिसिस कोर्टासमोर या 'अटी' शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांना कोर्टात हे सिद्ध करावं लागेल की, घटनांचा क्रम चेतन आणि सीयाचं घरातून निघणं, लोहगड पोहोचणं, ती घटना आणि त्यानंतरची परिस्थिती एक 'अतूट दुवा' तयार करतात, जो त्यालाच खुनी असल्याचं थेट सिद्ध करतो.

Advertisement

'पंचशील' तत्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, पोलीस तपासादरम्यान गोळा केलेल्या पुराव्यांच्या साखळीतील एकही महत्त्वाचा दुवा तुटला, तरी बचाव पक्षाला त्याचा फायदा घेता येतो. तज्ज्ञांनी स्पष्ट केलं की, जर आरोपी निर्दोष असण्याची १% जरी वाजवी शक्यता असेल, तर त्याला बेनिफिट ऑफ डाऊट म्हणजेच  संशयाचा फायदा दिला जाईल आणि त्याची निर्दोष मुक्तता होऊ शकते.