शुभम बायस्कार
कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल याचा नेम नाही. त्या रागाच्या भरात तो कोणते टोकाचे पाऊल उचलेले हे ही सांगता येत नाही. अशीच हैरण करणारी घटना अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील डोमा इथे घडली आहे. पत्नीने जेवणात खिचडी कमी वाढली. येवढं निमित्त झाले आणि पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. तिला इतकं मारली की त्यात तिचा मृत्यू झाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाकू सावलकर हे अमरावतीच्या डोमा या गावात राहातात. संध्याकाळी साडेचार वाजता ते घरी आले. त्यावेळी त्यांची पत्नी लुकाय लावलकर यांनी जेवणासाठी खिचडी वाढली. शिवाय त्याही जेवणासाठी बसल्या. त्यावेळी भाकू यांना कमी खिचडी वाढल्याचे दिसले. तर पत्नीने स्वत: ला जास्त खिचडी वाढून घेतल्याचे त्यांना दिसले. यावरून भाकू यांनी पत्नी बरोबर वाद घातला. त्या दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की त्यांनी आपल्या पत्नीला लाथा बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. ही मारहाण इतकी जबरदस्त होती की पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी पती भाकु सावलकरविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
हेही वाचा - बाप लेकीच्या नात्याला डाग, तेरा वर्षीय लेकीवर बापानेच टाकला हात
आरोपी भाकू सावलकर याचे वय 70 वर्षाचे आहे. तर पत्नी लुकाय यांचे वय 60 वर्षाचे आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय माणसाला कोणत्या गोष्टीचा कधी राग येईल आणि तो काय करेल याचा नेम राहीलेला नाही. त्याचीच प्रचेती या घटनेमुळे आली आहे.