जालन्यात एक अपहरणाने सर्वच जण हादरून गेले आहेत. पैशासाठी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करण्यात आले. त्याच्या सुटकेसाठी 5 कोटींची खंडणीही मागण्यात आली. घाबरलेल्या मुलाच्या वडीलांनी ऐवढी मोठी रक्कम ऐकून त्यांच्या पाया खालची वाळू सरकली. काय करावे हे त्यांना समजले नाही. त्यांनी ओळखीने थेट उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला. फडणवीसांनी तातडीने जालना पोलिस अधिक्षकांना सुचना केल्या. चक्र फिरली आणि सुरू झाला तो चोर आणि पोलिस यांच्यातला खेळ. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असेच या प्रकरणात घडले. 8 तासांच्या अथक परिश्रमाने शेवटी अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईल पकडले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कृष्णा मुजमुले हे जालना शहरातले व्यापारी आहेत. श्रीसुंदर मुजमुले हा त्यांचा मुलगा. त्याचे वय 13 वर्षे आहे. 25 जूला श्रीसुंदर हा घरातून शाळेत जाण्यासाठी सायकलवरून निघाला. त्याच वेळी त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी कृष्णा यांना फोन लावला. तुमच्या मुलाचे अपहरण केले आहे. तो जिवंत परत हवा असेल तर 5 कोटी रूपये द्या अशी मागणी करण्यात आली. जर पैसे दिले नाही आणि पोलिसांना याबाबत तक्रार केलीत तर मुलगा जिवंत सापडणार नाही अशी धमकी ही दिली. 5 कोटी मागितल्याने कृष्णा यांना काय कराले हेच समजले नाही. त्यांनीनंतर ओळखीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर सुत्र हलली.
ट्रेंडिंग बातमी - मविआत जागा वाटपाचा तिढा? '10 जागा द्या नाही तर...' अबू आझमींचं मोठं वक्तव्य
पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. अपहरणकर्त्यांनी मोबाईलवरून संपर्क केला होता. त्यामुळे त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यात आले. त्यांच्या बरोबर सतत बोलण्याचा सल्लाही पोलिसांनी दिला. शिवाय मागितलेले पैसे देण्याची तयारीही दाखवा असेही त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार शहराच्या कन्हैयानगर पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पैसे घेवून या असे अपहरणकर्त्यांनी सांगितले. कृष्णाही पैशाची बॅग घेवून बोलवलेल्या ठिकाणी पोहोचले. तीथे पोलिसांनी आधीपासूनच फिल्डिंग लावली होती.
ट्रेंडिंग बातमी - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, मलकापूरात काँग्रेसला खिंडार
कृष्णा यांना एका ठिकाणी पैशाची बॅग ठेवायला सांगितली होती. त्यानुसार त्यांनी ती बॅग तिथे ठेवली. बॅग घेण्यासाठी आरोपी तीथे पोहोचला होता. बॅग घेताना त्याच्यावर पोलिसांनी झडप टाकली. यात आणखी दोघे जण होते. तेही तीथेच अजूबाजूला होता. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.या प्रकरणी पोलिसांनी रोहित भुरेवाल,अरबाज शेख,नितिन शर्मा यांना अटक केली आहे. शिवाय गुन्ह्यात वापरलेली ओमनी कार,दुचाकी ही जप्त करण्यात आली आहे. शिवाय 13 वर्षाच्या श्रीसुंदरचीही सुरक्षित पणे सुटका केली आहे.