Kolhapur Crime: लिव्ह इन रिलेशनशिपचा भयंकर शेवट! आधी प्रेयसीची हत्या, आता बॉयफ्रेंडचाही मृतदेह सापडला

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 विशाल पुजारी, कोल्हापूर: लग्नाला नकार दिल्याने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणीची प्रियकराने निर्घृण हत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली होती. प्रेयसीच्या हत्येनंतर प्रियकर फरार झाला होता, पोलीस त्याचा शोध घेत होते. अशातच या प्रकरणात एक खळबळजनक अपडेट समोर आली असून प्रेयसीचा खून करणाऱ्या प्रियकरानेही आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकराकडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. समीक्षा नरसिंगे असे या हत्या झालेल्या तरुणीचे नाव होते तर सतीश यादव असे आरोपी प्रियकराचे नाव होते. समीक्षाच्या हत्येनंतर प्रियकर सतीश यादव फरार झाला होता. 

पोलीस त्याचा शोध घेत होते. अशातच गुरुवारी सकाळी सतीश त्याच्या मूळगावी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे सतीश यादवने एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पोलिसांकडून देण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे. 

(Bengaluru Stampede : कुणी दबलं, कुणी चिरडलं... RCB विजेतेपदाच्या जल्लोषातील चेंगराचेंगरीचे 5 भयानक Video)

का झाला भयंकर शेवट?

हत्या झालेली समीक्षा नरसिंगे आणि सतीश यादव यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. समीक्षाचा यापूर्वी विवाह झाला होता मात्र पतीसोबत वाद झाल्यानंतर ती सतीशच्या संपर्कात आले. दोघेही करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये लग्नावरुन वाद सुरु होते. सतीशने समीक्षाकडे लग्नसाठी तगादा लावला होता.

Advertisement

मात्र समीक्षा त्याला नकार देत होती. यावरुन वाद झाल्याने समीक्षा तिच्या आईकडे राहायला गेली होती. मात्र सतीशने तिला भेटायला बोलावून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. तरुणीच्या छातीमध्ये सुरा खूपसून त्याने तिला निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र त्याचाही मृतदेह सापडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.