जाहिरात

Kolhapur news: नग्नावस्थेत स्त्री पुरूषाकडून भरदिवसा अघोरी पूजा, स्मशानभूमीत भानामती- करणीचा थरार

जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Kolhapur news: नग्नावस्थेत स्त्री पुरूषाकडून भरदिवसा अघोरी पूजा, स्मशानभूमीत भानामती- करणीचा थरार
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्रात आहेत. कायदा असला तरी या कायद्याचा धाक मात्र कुणाला नाही अशीच स्थिती आहे. राज्यात अनेक ठिकाणी मंत्रतंत्र, जादूटोणा, करणी, अघोरी पूजा यांच्या घटना होतच असतात. सर्रास होणाऱ्या या घटनांवर मात्र कोणाचाही वचक नाही. त्यातून अंधश्रद्धा निर्मूल होणे दुरच पण अंधश्रद्धेला खतपाणी  घातले जात आहे. असाच एक धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातल्या उदगावमध्ये निदर्शनास आला आहे. विशेष म्हणजे ही अघोरी पूजा रात्रीच्या अंधारात न होता दिवसाच्या उजेडात केली गेली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावच्या स्मशानभूमीत अघोरी कृत्य केल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एक महिला आणि पुरुषाकडून अघोरी पूजा केली जात आहे. हे दोघे ही  भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार करत होते. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे दोघेही आलटून पालटून हे अघोरी कृत्य करताना सीसीटीव्हीत आढळले आहेत.  या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे.  

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आजी अन् नातीचं शव, 7 दिवसानंतर ओळख पटली, तो Video...

जयसिंगपूर येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षा विसर्जनाच्या दिवशी सर्व नातेवाईक वैकुंठधाम या ठिकाणी आले. मात्र अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून काळी बाहुली, नारळ, नावाची चिठ्ठी लिहून भानामतीचा प्रकार केला होता. ही बाब मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यांना याचा धक्का बसला. त्यानंतर त नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली.  

ट्रेंडिंग बातमी - Bachchu Kadu: बच्चू कडूंना दिलासा नाहीच, जिल्हा बँक अपात्रता प्रकरण, न्यायालयात काय घडलं?

यामध्ये महिला आणि पुरुषाकडून नग्न होऊन करणी, भानामतीचा प्रकार सुरू असल्याचे समोर आलं. मात्र पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाम आल्याचे दिसून आले. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, बुधवार या दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत असल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर आता उदगाव ग्रामपंचायतकडून तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. मात्र ते हे का करत होते, शिवाय ते कोण  आहेत याची माहिती मात्र समोर येवू शकलेली नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com