Kolhapur News: विषय हार्ड!'नांदायला येते पण...', बायकोच्या मागणीने नवरा हादरला

लक्ष्मी लखन बेनाडे असं या महिलेचे नाव आहे. या महिलेसोबत लखनचं 2024 मध्ये लग्न झाले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

विशाल पुजारी 

लग्नानंतर सुरू झालेल्या कौटुंबिक वादातून विभक्त राहत असलेल्या बायकोने परत नांदायला येण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याची घटना घडली आहे. रांगोळी या गावातील तरुणाने ही घटनेची फिर्याद शाहूपुरी पोलिसात दिली आहे. लखन बेनाडे असं फिर्यादी तरुणाचं नाव आहे. लग्नानंतर त्याच्या पत्नीने पावणेपाच लाखांच्या रोकडसह एक तोळे दागिने घेवून माहेर गाठलं. शिवाय जाताना बरोबर तीन मोबाइल घेऊन गेल्याची तक्रारही दिली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात पत्नीसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबतच्या अधिक माहितीनुसार, लखन बेनाडे यांनी शाहूपुरी पोलिसात या प्रकरणाची फिर्याद दिली आहे. पत्नीने फसवणूक करून तीन लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार केली आहे. लक्ष्मी लखन बेनाडे असं या महिलेचे नाव आहे. या महिलेसोबत लखनचं 2024 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर वादातून दोघांमध्ये खटके उडू लागले. या सर्व गोष्टीमुळे पत्नी विभक्त राहू लागली. काही दिवसांपूर्वी लखन पत्नीकडे गेल्यानंतर तिने तीन लाख रुपयाची मागणी केली. तीन लाख दे मग मी नांदायला येते असं तिने थेट पतीला सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

पत्नी विभक्त राहिल्यानंतर तिने आणि तिच्या नातेवाइकांनी वेळोवेळी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाभोळकर कॉर्नर येथे पावणेपाच लाखांची रोकड घेतली. लग्नात घातलेले एक तोळ्याचे दागिने आणि घरातील तीन मोबाइल घेऊन पत्नी लक्ष्मी निघून गेली. तिला परत आणायला गेल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी मारहाण केली. तसेच तिला पुन्हा घेऊन जायचे असेल तर तीन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. या त्रासाला कंटाळून अखेर त्याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

ट्रेंडिंग बातमी - Nagpur News: जुगाराचं व्यसन, मोठ्या पगाराची नोकरी सोडली, इंजिनियर तरुणाने जे केलं ते...

या प्रकरणी आता पत्नी लक्ष्मी लखन बेनाडे राहाणार राजारामपुरी, हिच्यासह गोपाल विधामनी, काजल गोपाल विधामनी,विशाल बाबूराव गस्ते, विश्वजित विशाल गस्ते, आकाश गस्ते , संस्कार सावर्डेकर आणि अजित चुडेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला जातो. सासरी नांदायला यायचं असेल तर माहेरून पैसे आण  असं सांगितल्याच्या बातम्या ही आपण पाहातो. पण या प्रकरणात पत्नीनेच पतीकडे नादायला येण्यासाठी तीन लाखांची मागणी केल्याची घटना सर्वांनाच चक्रावून सोडणारी आहे. 

Advertisement