विशाल पुजारी, प्रतिनिधी
कोल्हापुरात रिल्स स्टार युगलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरूणाने मोबाइलमधील डाटा कॉपी करून त्यातील अश्लील व्हिडिओ व्हायरल केले. शाहूपुरी पोलिसात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. उमेश भास्कर असं या तरुणाचं नाव आहे.
कोल्हापुरातील एका तरुण आणि तरुणीचे अश्लील व्हिडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असणारे व्हिडिओतील दोघेही प्रसिद्ध रिल्स स्टार आहेत. त्यामुळे या दोघांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत होता. मात्र याची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. रविवारी हे व्हिडिओ व्हायरल झाल्याची बातमी संपूर्ण शहरभर वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली.
व्हायरल व्हिडिओतील रील्स स्टार तरुणीने या प्रकरणाची 25 जून रोजी शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल केली. 23 वर्षीय तरुणीने व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापही व्यक्त केला. तिने दाखल केलेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित तरुणांची कसून चौकशी करण्यास सुरू केली. शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. उमेश सुरेश भास्कर (वय 32) असं तरुणाचं नाव आहे. हा तरूण कुडित्रे (ता. करवीर) या गावातील रहिवासी आहे.
नक्की वाचा - व्हिडीओ कॉल जीवावर बेतला; नवऱ्याने डोक्यात रॉड मारून बायकोला संपवलं
तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, रिल्स स्टार असलेल्या युगलांनी हे व्हिडिओ शिये फाटा येथील एका हॉटेलजवळ संमतीने रेकॉर्ड केले होते. ऑक्टोबर 2023 मध्ये हे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते. रिल्स स्टार तरुणाच्या मोबाइलमध्ये सर्व व्हिडिओ होते. या तरुणाने नवीन मोबाईल घेतला. त्यामुळे व्हिडिओ असलेला जुना मोबाईल मधील डाटा कॉपी करण्यासाठी रिल्स स्टारने मोबाइल दुकानामध्ये काम करणार्या आरोपी उमेश भास्कर या तरुणाची मदत घेतली. 19 जून रोजी ही मदत रिल्स स्टारने घेतल्याचं पोलीस तक्रारीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान आरोपीने जुन्या मोबाईल मधील डाटा आपल्याकडे कॉपी करून घेतला. आणि सर्व व्हिडिओ त्याने व्हायरल केले असे फिर्यादीत म्हटलं गेलं आहे.
मोबाईल दुकानात काम करणार्या या बहाद्दराने रिल्स स्टार युगलांचा डेटा कॉपी करून व्हिडिओ व्हायरल केले. रिल्स युगलांची बदनामी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी या आरोपी उमेश भास्करवर भा.दं.वि.स कलम 354 आणि माहिती व तंत्रज्ञान संबंधित गुन्हा दाखल केला आहे.