Latur Car Burning Case: 1 कोटींसाठी लिफ्ट दिलेल्या व्यक्तीला जाळलं, 'त्या' चॅटिंगने सत्य समजलं, असा रचला कट...

Ganesh Chavan Buring Car Case: वसुली एजंटचा गाडीतच जळाून मृत्यू झाला असा सर्वांचाच समज झाला, मात्र तपासात माणुसकीला काळीमा फासेल अशी स्टोरी समोर आली. 

जाहिरात
Read Time: 3 mins

Latur Car Burning Murder Case: बॉलिवूडच्या थ्रीलर, सस्पेन्स चित्रपटाच्या कथेला लाजवेल.. अशी थरारक अन् हादरवून टाकणारी घटना महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यामध्ये घडली. लातूरच्या औसा तालुक्यातील वानवडा रस्त्यावर एका व्यक्तीला पोत्यात घालून गाडीसह जिवंत जाळल्याची घटना घडली. गणेश चव्हाण या व्यक्तीची ही गाडी असल्याने त्याचीच अशी भयंकर निर्घृण हत्या केली, असा समज सर्वांचा झाला. मात्र एका कॉल अन् मेसेजने या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले अन् मन सुन्न करणारी मर्डर मिस्ट्री उलगडली. 1 कोटी विम्याच्या पैशासाठी हा कट रचल्याचे समोर आले. 

1 कोटींच्या विम्यासाठी भयंकर कट..

समोर आलेल्या माहितीनुसार, लातूरमध्ये औसा तालुक्यात एका गाडीत जळालेला मृतदेह आढळला. पोलिसांनी तपास सुरू केला आणि ती गाडी गणेश चव्हाण या खाजगी बँकेच्या एका वसुली एजंटने चालवल्याचे निष्पन्न झाले. तो अनेक तासांपासून बेपत्ता होता आणि त्याचा मोबाईल फोन बंद होता, त्यामुळे वसुली एजंटचा गाडीतच जळाून मृत्यू झाला असा सर्वांचाच समज झाला, मात्र तपासात माणुसकीला काळीमा फासेल अशी स्टोरी समोर आली. 

Rana Balachauria Murder: 'सिद्दू मुसेवालाच्या हत्येचा बदला', कबड्डीपटू राणा बालचौरियाला गोळ्या झाडून संपवलं

गणेश चव्हाण याने १ कोटी रुपयांची टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी हा सर्व कट रचल्याचे उघड झाले. त्याने लातूरमधील औसा येथील यकटपूर रोड येथील गोविंद यादव नावाच्या व्यक्तीला त्याच्या कारमध्ये बसवले आणि नंतर वानवाडा पाटीजवळ जिवंत असलेल्या व्यक्तीसह कार पेटवली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या गोविंदने त्याच्याकडे लिफ्ट मागितली होती. गणेशन कारमध्ये बसवले आणि नंतर वानवाडा पाटीजवळ त्याला पोत्याचत कोंबले आणि कार पेटवून दिली. 

 घटनेनंतर गणेश चव्हाण त्याचाच मृत्यू झाला आहे असे भासवण्यासाठी सिंधुदुर्गला पळून गेला. औसा पोलिस ठाण्यात तातडीने अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरू करण्यात आला. मात्र पोलिसांना या प्रकरणात वेगळाच कट असल्याचा संशय येत होता. या संशयावरून गणेश चव्हाण आणि त्याच्या इतर माहितीची चौकशी केली असता, त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध असल्याचे आढळून आले.

महिलेशी चॅटिंग अन् मेसेज.. असं फुटलं बिंग

गणेशने त्याचा नंबर बंद केला होता आणि वेगळ्या नंबरवरून तिच्याशी चॅटिंग करत होता.  महिलेची चौकशी केली तेव्हा कळले की घटनेनंतर गणेश चव्हाण तिसऱ्या नंबरवरून तिला मेसेज करत होता आणि चॅटिंग करत होता.  संशयाची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांनी त्या नंबरचा मागोवा घेण्यास सुरुवात केली.  तपासाची टीम कोल्हापूर आणि नंतर कोल्हापूरहून सिंधुदुर्ग-विजयदुर्गला पोहोचली, तिथे गणेश जिवंत सापडला. 

Advertisement

नक्की वाचा - Latur News: भयंकर कांड! तरुणाला आधी पोत्यात भरलं, मग गाडीत टाकलं, कारला आग लावून जिवंत जाळलं

यावरून गाडीत सापडलेला सांगाडा गणेश चव्हाणचा नसून दुसऱ्या कोणाचा तरी आहे हे सिद्ध झाले. पोलिसांनी गणेश चव्हाणला चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने कबूल केले की त्याने फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी किंवा त्याने काढलेले १ कोटी रुपये मुदत विम्याचे पैसे मिळवण्यासाठी हा कट रचला होता. गणेशने स्वतःच्या कर्जासाठी एका निष्पाप व्यक्तीचा बळी घेतला.