Latur Crime: 'फी भरायला पैसे नाहीत', एका वाक्याने मुलगा चिडला, बापाला संपवलं, लातुरमध्ये खळबळ

Latur Crime Son Killed Father: कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे न दिल्याने मुलानेच जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याची भयंकर घटना लातूरच्या चाकुर तालुक्यात घडली. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

त्रिशरण मोहगावकर, लातूर

Latur Crime: गरिबी वाईट असं म्हणतात. गरिबीने अनेकांचे संसार उघड्यावर येतात उध्वस्त होतात. अशीच काळीज पिळवटून टाकणारी धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना लातूरमध्ये घडली आहे. कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे न दिल्याने मुलानेच जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याची भयंकर घटना लातूरच्या चाकुर तालुक्यात घडली. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, लातूरच्या चाकुर तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे.मुलाने बापाला कॉलेजची फीस भरण्यासाठी पैसे मागितले.  त्यावर वडिलांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर दोघात सुरू झाला. याच वादातून मुलाने बापाच्या डोक्यात काठी घातली. या हल्ल्यात जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Ayush Komkar Case: भयंकर सूडचक्र! एक मर्डर अन् अख्खं कुटुंब तुरुंगात, पुण्याच्या गँगवॉरची हादरवणारी STORY

चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावामध्ये देविदास पांचाळ कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा चाकूर येथील कॉलेजमध्ये शिकावयास आहे. त्याने बापाकडे पैशाची मागणी केली, मात्र जोरदार झालेल्या पावसामुळे स्वयंपाकासाठी लागणारा गॅस संपला आहे.  सरपण भिजल्याने घरात ठेवलेले पैसे गॅस आणण्यासाठी वापरल्याने पैसेच शिल्लक नसल्याचं बापाने सांगितले. दोघांमध्ये वाद सुरू झाला.

वादाच्या दरम्यान मुलाने बापाच्या डोक्यात काठी घातली, तर मुलगा आणखी मारेल या भीतीने बापाला घरात कोंडून आईने कडी लावली. नंतर बापाला बाहेर काढून चाकूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान देविदास पांचाळ यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती चाकुर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे तर घटनेचा पुढील तपास चाकूर पोलीस करत आहेत या घटनेने पुन्हा एकदा गरीबीचा विषय चव्हाट्यावर आला आहे तर देविदास पांचाळ यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री