जाहिरात

Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री

Pune Ayush Komkar Murder Andekar Gang 40 Year Crime History: जिवाला जीव देणारे जिवावर का उठले? आंदेकर टोळीचा संपूर्ण इतिहास

Andekar Gang History: नाना पेठेत दहशत! टोळी प्रमुख ते राजकारण, आंदेकर गँगची डेंजर हिस्ट्री

Pune Andekar Gang 40 Year Crime History: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून त्यांचा मारेकरी गणेश कोमकर याच्या मुलगा आयुष कोमकर (१८) याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा टोळी युद्ध पेटण्याची भीती व्यक्त होत आहे. आयुषच्या आईच्या फिर्यादीवरून आंदेकर टोळीतील बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल झाले असून यश पाटील व अमित पाटोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयुषच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पुण्याच्या नाना पेठेत दहशत माजवणाऱ्या आंदेकर टोळीचा रक्तरंजित इतिहास समोर आला आहे. जाणून घ्या पुण्याच्या गँगवॉरचा इतिहास..

80 च्या दशकात सुरुवात, नाना पेठेत दहशत..

१९८० च्या दशकात पुणे शहरात अनेक छोट्या-मोठ्या टोळ्या होत्या. जुगाराच्या अड्डे, दारूची अवैध विक्री आणि खंडणी ही मुख्य कमाई होती. सायकलच्या चेन, रामपूरी चाकू, तलवार आणि सोडा वॉटरच्या बाटल्या  हीच शस्त्रे वापरून टोळ्या आपलं वर्चस्व सिद्ध करत होत्या. यातच आंदेकर टोळी उदयास आली. या टोळीचे प्रमुख होता बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर. नाना पेठ, भवानी पेठ आणि गंज पेठ या भागात या टोळीची पकड मजबूत झाली. सुरुवातीला ही टोळी माळवडकर गँगशी मित्र होती, पण वर्चस्वाच्या लढाईतून शत्रू झाली.

पहिली हत्या 

१९८४ मध्ये बाळू आंदेकरला शिवाजीनगर कोर्टाच्या आवारात प्रमोद माळवडकरने त्याच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेतला आणि गोळ्या घालून हत्या केली. हा खून पुण्याच्या इतिहासातील पहिला मोठा गँगवॉर ठरला. त्यानंतर दहा वर्षे चाललेला माळवडकर-आंदेकर युद्धात सहा गुंड मारले गेले, आणि अनेक हल्ले झाले. १९९७ मध्ये पुणे क्राईम ब्रँचने काळेवाडी येथे प्रमोद माळवडकरचा एनकाऊंटर केला. याने माळवडकर टोळी संपली, पण आंदेकर टोळी मात्र मजबूत झाली. बाळूच्या भावाने सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरने (६८ वर्षे) सूत्रे हातात घेतली. बंडूने पुण्याच्या अंडरवर्ल्डवर कंट्रोल मिळवला. 

आंदेकरांची राजकारणात एन्ट्री

१९९७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीने आंदेकर टोळीला नवं रूप दिलं. चार टोळी सदस्य नगरसेवक झाले, त्यात वत्सला आंदेकर (बंडूची बहीण) ही १९९८-९९ मध्ये पुण्याची महापौर झाली. तिला “अक्का” म्हणून ओळखलं जायचं. तिने गुन्हेगारीपासून अलिप्त राहून राजकारण केलं, पण टोळीचे भाऊ मात्र हिंसेने विरोधकांना संपवत राहिले. उदयकांत आंदेकर (१९९२ मध्ये नगरसेवक), राजेश्री आंदेकर (२००७ आणि २०१२ मध्ये नगरसेविका) आणि वनराज आंदेकर (२०१७ मध्ये NCP चे नगरसेवक) – हे सर्व कुटुंबातील राजकीय चेहरे होते. पण राजकारण हे फक्त कव्हर होते; मागे गुन्हेगारी सुरूच राहिली.

बंडू आंदेकरवर फरासखाना पोलीस स्टेशनशी संबंधित खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगात गेल्याने टोळी कमकुवत झाली, पण वनराज आणि कृष्णा आंदेकरने (बंडूचे मुलगे) व्यवसाय चालवला. २००९ मध्ये दोघांनाही शहराबाहेर हाकलण्यात आलं. बंडू बाहेर आल्यावर टोळी पुन्हा वाढली, पण इतर टोळ्यांशी संघर्ष वाढला. 

मामाची हत्या, भाच्याच्या खूनाने बदला! धडाधड 9 गोळ्या अन् घोषणा.. आयुष कोमकरला कसं संपवलं?

वनराज आंदेकरची हत्या

१ सप्टेंबर २०२४ रोजी नाना पेठेतील दोके तालिमजवळ वनराज आंदेकरची निर्घृण हत्या झाली. रात्री ९ वाजता वनराज आपल्या चुलत भाऊ शिवमशी बोलत असताना १०-१५ तरुणांनी सहा बाईकवर येऊन हल्ला केला. पाच गोळ्या झाडल्या, कोयत्याने डोके फोडले. हल्लेखोरांनी रस्त्याची वीज बंद केली आणि वनराजला वेढा घातला. तो जागीच ठार झाला. वनराजच्या हत्येला त्यांच्या घरातील कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचे समोर आले. 

बहिणीनेच काढला काटा.. 

वनराजच्या दोन बहिणी – संजीवनी आणि कल्याणी – त्यांच्या पती जयंत आणि गणेश कोमकर यांच्याशी वाद झाला. संजीवनीचा दुकानावर अतिक्रमण कारवाई झाली. जी वनराजने नगरसेवक असताना केली असल्याचा संशय. ३१ ऑगस्टला पोलिस स्टेशनमध्ये वाद झाला, संजीवनीने तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती: त्यानंतर त्यांनी या हत्येचा कट  सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दूधभटे यांनी कट रचला. या सोमनाथ गायकवाडने २०२१ मध्ये टोळी सोडली आणि अंबेगाव पठारात स्वतंत्र गँग उभी केली. २०२३ मध्ये गायकवाडच्या मित्र निखिल अखाडेचा खून आंदेकर टोळीने केला होता, त्याचा बदला हा होता. त्यासाठी तो या कटामध्ये सहभागी झाला. 

मामाची हत्या भाच्याच्या खूनाने बदला.. 

आता पुन्हा एकदा गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला, नाना पेठेत रक्त सांडले. १८ वर्षीय आयुष अनिल आंदेकर (वास्तविक आयुष गणेश कोमकर, वनराजचा नातू आणि गणेश कोमकरचा मुलगा) ट्यूशननंतर घरी परतत असताना बेसमेंट पार्किंगमध्ये दोन बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी ९-११ गोळ्या झाडल्या. शरीरातून ९ गोळ्या बाहेर पडल्या, तो जागीच ठार झाला. CCTV मध्ये दिसतंय की हल्लेखोरांनी वेगाने पळ काढला. या हत्येनेच वनराजच्या खूनाचा बदला पूर्ण झाला. 

दरम्यान, गेल्या वर्षी वनराजचा खून आणि आता आयुषचा.  हे कुटुंब वाद आणि जुने वैर. गायकवाडने २०२१ मध्ये टोळी सोडली, २०२३ मध्ये त्याचा मित्र मारला गेला.  पोलिस MCOCA वापरत आहेत, पण साक्षीदार भीतीने बोलत नाहीत. सोशल मीडियावर धमक्या येतात, रील्समध्ये शस्त्रं दाखवतात. पुणे पोलीस आयुक्त म्हणतात, “सुरक्षा वाढवली, पण टोळ्या वेगळ्या पद्धतीने हल्ले करतात.” हे गॅंगवार संपणार नाही, जोपर्यंत जमिनीची लढाई आणि राजकारण चालूच राहणार.. अशा भावना पुणेकर व्यक्त करत आहेत. 

Pune Crime: सिनेस्टाईल थरार! पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; सातारच्या भाईला ठोकलं

Listen to the latest songs, only on JioSaavn.com