लातूरला हादरवणाऱ्या 3 वर्षांच्या चिमुरड्याच्या अपहरण नाट्याचा शेवट, आरोपीचे मुलाच्या आईशी...

Latur News : लातूर शहरातून तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Latur Crime News : 26 मे रोजी या चिमुरड्याचे अपहरण झाले होते.
लातूर:

त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी 

Latur News : लातूर शहरातून तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसंच हा चिमुरडा आता त्याच्या पालकाकडं सोपवण्यात आला आहे. लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं धडाडीनं कामगिरी करत या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीनं मुलाचं अपहरण का केलं होतं? याचं कारण देखील पोलीस तपासामध्ये उघड झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

लातूर शहरातील कव्हा रोड भागातील गुमास्ता कॉलनीमधील तीन वर्षाच्या मुलाचं 26 मे रोजी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणात अज्ञात इसमाच्या विरोधात शहरातील विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणात अखेर 11 दिवसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे. महेश रमाकांत सुर्यवंशी असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. तो सिद्धेश्वर नगर औसामधील रहिवाशी आहे. महेशनं मुलाचं अपहरण केल्याची कबुली दिली आहे.

(नक्की वाचा : Navi Mumbai Crime : पोलीस म्हणून आले आणि ATM लूटून पसार झाले, सानपाडामधील प्रकरणात नवा खुलासा )
 

विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपीला आज (शुक्रवार, 6 जून) पंढरपूरमधून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतलं. हा चिमुरडा सुखरुप असून त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपहरणापूर्वी चिमुरड्याच्या आईसोबत अपहरणकर्त्याचा किरकोळ वाद झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी त्याचे अपहरण करण्यात आले होते. 

Advertisement
Topics mentioned in this article