- लातूरच्या एमआयडीसी परिसरात प्रियांका जितेंद्र कांबळे नावाच्या रिलस्टार तरुणीने वायर चोरी केली
- प्रियांकाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सुमारे ३२ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत
- चोरी करताना प्रियांका सीसीटीव्ही कॅमेर्यात स्पष्टपणे कैद झाली, ज्यामुळे स्थानिक पोलीस तिला ताब्यात घेतले आहे
सध्या अनेक ठिकाणी रीलस्टारचा सुळसुळाट आहे. इन्स्टाग्रामवर लाईक मिळावे यासाठी ते वाट्टेल ते करताना आपल्याला दिसतात. त्यातून त्यांचो फॉलोअर्स ही वाढताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे स्टार होता. त्यांना रिलस्टारम्हणून संबोधले जाते. त्यांना लाईक करणारा एक मोठा वर्ग ही असतो. अशाच एका रिलस्टारचा कारनामा समोर आला आहे. ही रिलस्टार लातूरची असून तिने चक्क चोरी केल्याचं समोर आलं आहे. तिच्या या चोरीनाम्यामुळे पोलीस ही चक्रावले आहेत. लातूर पोलीसांनी तिला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
प्रियांका जितेंद्र कांबळे असं या रीलस्टार तरुणीचे नाव आहे. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 32 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती नेहमी आपल्या या अकाऊंटवर वेगवेगळे व्हिडीओ आणि रिल्स टाकत असते. त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स ही मिळतात. हीच तरुणी लातूरच्या एमआयडीसी परिसरात चोरी करताना आढळून आली आहे. या भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
बांधकाम ठिकाणी लाईट फिटींगसाठी वापरली जाणारी वायर होती. या वायरची किंमत जवळपास 41 हजार होती. हीच वायर या रिलस्टार म्हणवणाऱ्या प्रियांकाने चोरली. त्यानंतर ती तिथून पसार झाली. पण तिची ही चोरी ज्या कॅमेऱ्यामुळे रिलस्टार केले त्याच कॅमेऱ्यात कैद झाली. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे होते. चोरी करत असताना ती त्या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट पणे दिसत आहे. चोरी झाल्यानंतर त्याबाबतची तक्रार देण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेने या चोरीचा तपास सुरू केला. त्यांनी तिथला सीसीटीव्ही पडताळून पाहीला. त्यात त्यांना प्रियंका कांबळे ही चोरी करताना स्पष्ट पणे दिसली. त्यानंतर स्थानिक शाखेने या तरुणीला ताब्यात घेतले. त्यानंतर तिचा ताबा एमआयडीसी पोलीसांकडे देण्यात आला. तिने वायर कशासाठी चोरली हे अजून स्पष्ट झाले नाही. मात्र तिने चोरी केल्याची बातमी वाऱ्या सारखी सगळीकडे पसरली. त्यामुळे तिच्या फॉलोअर्सली ही धक्का बसला आहे. तिने चोरी जोमात केली पण फॉलोअर्समात्र कोमात गेले अशी स्थिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world