मास्तराबरोबर गाडीत ओळख, नोकरीचं आमिष, 'तिच्या' बरोबर भयंकर घडलं

ही महिला 30 वर्षाची आहे. या शिक्षकाने तिला पुढे आपण तुला नोकरीला लावू असे आमिष दाखवले. तिला गरज होती. त्यामुळे तीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला.

जाहिरात
Read Time: 2 mins
लातूर:

एसटीमध्ये झालेली एक ओळख एका महिलेला चांगलीच भारी पडली आहे. ही महिला धाराशिव जिल्ह्यात राहाते. एक दिवस ती प्रवास करत होती. त्यावेळी त्या गाडीत विठ्ठल हुगेवाड हा शिक्षक प्रवास करत होता. त्याच वेळी या दोघांची ओळख झाली. त्यानंतर हे दोघे सतत बोलत होते. ही महिला 30 वर्षाची आहे. या शिक्षकाने तिला पुढे आपण तुला नोकरीला लावू असे आमिष दाखवले. तिला गरज होती. त्यामुळे तीनेही त्याच्यावर विश्वास ठेवला. पुढे मात्र त्या महिले बरोबर जे झालं ते भयंकर होतं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या 30 वर्षीय महिलेला नोकरीची गरज होती. ही गरज त्या मास्ताराने हेरली. धाराशिव वरून तिला लातूरला बोलवून घेतले. नोकरी मिळू शकते असा त्या महिलेला विश्वास पटला होता. त्यामुळे तिनेही लातूरला जाण्याचा निर्णय घेतला. दोघांची ओळख चांगली झाली होती. पण त्याचा गैरफायदा त्या मास्तराला घ्यायचा होता. लातूरमध्ये ती महिला आल्यानंतर त्याने तिला एका लॉजवर नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. 

ट्रेंडिंग बातमी - लाडक्या बहिणीची प्रतिक्षा संपणार? ऑगस्ट-सप्टेबरचे पैसे 'या' दिवशी खात्यात जमा होणार

प्रकरण इथेच थांबले नाही. त्याच्यानंतर आणखी तिघांनी या महिलेवर बलात्कार केला. त्यामुळे त्या महिलेला याचा मोठा धक्का बसला. तिने तातडीने शहरातील विवेकानंद चौक पोलिसात धाव घेतली. आपल्या बरोबर झालेल्या प्रकाराची माहिती तिने पोलिसांना दिली. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. पोलीसांनी याबाबत सुत्र हलवत एका आरोपीला या प्रकरणात ताब्यात घेतले आहे. महिलेने आपल्यावर चार जणांनी अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री', बारामतीतील बॅनरची राज्यभर चर्चा

या सामूहिक बलात्कारात एकूण चार आरोपी आहेत. त्यातील मुख्य आरोपी असलेल्या शिक्षकाला पोलीसांनी अटक केली आहेत. तर इतर तीन जणांचा शोध पोलीस घेत आहेत. या तीघांचा यात काय रोल होता? त्यानी त्या महिलेला कोणतं आमिष दाखवलं होतं याचाही शोध आता पोलिस घेत आहेत. मात्र एका शिक्षकाने असे कृत्य केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शिवाय याचा निषेधही सर्वत्र करण्यात येत आहे.  

Advertisement