लाडकी बहिण योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. जून-जुलै महिन्याचा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा झाला. पण ऑगस्ट आणि सप्टेबरचा हफ्ता अजून पर्यंत काही जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. पैसे कधी जमा होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. सरकारकडूनही तारीख पे तारीख दिली जात आहे. पण पैसे काही जमा झालेले नाहीत. पण आता त्यांच्यासाठी खूशखबर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय ते कधी जमा होणार आहेत हेही स्पष्ट करत बहिणींना दिलासा दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अर्ज केले आहेत. ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत. त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या महिलांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, त्यांची प्रतिक्षा आता संपुष्टात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार? याची माहितीच दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री', बारामतीतील बॅनरची राज्यभर चर्चा
अनेक महिलांनी ऑगस्टच्या शेवटी अर्ज केले आहे. त्याची पडताळणी आता पूर्ण झाली आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहे. या योजनेचे पैसे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे मिळणार आहे. हे पैसे याच महिन्याच्या शेवटी महिलांच्या खात्यात जमा होतील असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. नागपूर इथं इमारत बांधकाम कामगारांना किट वाटप करताना त्यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिली.
ट्रेंडिंग बातमी - केंद्रीय निवडणूक आयोगाचा मुंबई दौरा, विधानसभा निवडणूकीची घोषणा कधी?
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची ही महत्वकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळाला असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच योजना घोषीत झाल्यापासून आता पर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तींमध्ये शिथिलता आणण्यात आली आहेत. जेणे करून महिलांसाठी सुलभ होईल. या योजनेत प्रत्येक महिलेला दरमहा पंधराशे रूपये दिले जाणार आहेत. पहिला हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. दुसऱ्या हफ्त्याची त्यांना आता प्रतिक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world