मुंबईत झाली सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट? 1 महिना वॉट्सअप कॉलवर ठेवलं LIVE अन् लुटले तब्बल...

एका 77 वर्षाच्या महिलेले तब्बल एक महिना डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आली होती. तीला वॉट्सअप कॉलवर लाईव्ह ठेवण्यात आलं होतं.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

गेल्या काही काळापासून सायबर क्राईमच्या गुन्ह्यांत वाढ होताना दिसत आहे. त्यात डिजिटल अरेस्टचा प्रकार वाढला आहे. त्यातून कोट्यवधी रूपये ठगले जात आहेत. असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. विशेष म्हणजे यात आतापर्यंतची सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट मुंबईत झाली आहे. एका 77 वर्षाच्या महिलेले तब्बल एक महिना डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आली होती. तीला वॉट्सअप कॉलवर लाईव्ह ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्याकडून 3.8 कोटी रूपये लुटले गेले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दक्षिण मुंबईत एक 77 वर्षीय महिला राहाते. याच महिलेला एक महिना डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आले होते. तिला एक फोन कॉल केला गेला. त्यात तिला आपण मुंबई पोलिसातून बोलत असल्याचे सांगितले. शिवाय मनी लॉन्ड्रींग केसमध्ये तुम्हाला अटक होवू शकते असं तिला सांगण्यात आलं. ही महिला आपल्या निवृत्त पती बरोबर राहते. तर मुलं परदेशी राहतात. याचा गैर फायदा घेत सायबर चोरांनी तिला घाबरवलं.    याची सुरूवात एका वॉट्सअप कॉलने झाली. त्या महिलेला एक वॉट्सअप कॉल आला होता. त्या द्वारे सांगितलं गेलं की तुमच्या नावाने एक पार्सल तैवानला पाठवण्यात आलं होतं. त्यात 5 पासपोर्ट, बँक कार्ड, 4 किलो कपडे आणि नशेसाठी वापरली जाणारी औषध आढळली आहेत. त्यानंतर त्या महिलेने आपण असं कोणतं ही पार्सल पाठवलेलं नाही असं स्पष्ट पणे सांगितलं. पण त्या फोन करणाऱ्यांनी त्यावर तुमची सर्व आधार डिटेल्स असल्याचं सांगितलं. शिवाय तो कॉल आपण मुंबई पोलिसांकडे ट्रान्स्फर करत असल्याचं सांगितलं. त्यावर त्या महिलेला सांगितलं की तुमचं आधार कार्ड मनी लॉन्ड्रिंगसाठी लिंक आहे 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  मुख्यमंत्री ठरण्याआधीच आता मंत्रिपदासाठी लॉबिंग, उत्तर महाराष्ट्रातले 18 आमदार सरसावले

हे सांगितल्यावर ती महिला घाबरली. तिला त्याच वेळी स्काई अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं गेलं. त्या आधारे आपण संपर्कात राहू. तुमच्यावर आमचं लक्ष असेल असंही तिला सांगितलं गेलं. यावर तुम्ही कोणाला काही सांगायचं नाही असंही तिला धमकावण्यात आलं. फोन करणाऱ्याने आपण IPS आनंद राणा आणि फायनान्स विभागाचे अधिकारी जॉर्ज मैथ्यू असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या महिलेला बँक अकाऊंट नंबर देण्यात आले. त्या अकाऊंटवर पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर आम्ही चौकशी करू असंही तिला सांगण्यात आलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण आणि शपथविधी कधी? रावसाहेब दानवे यांनी सांगितला महायुती सरकारचा प्लान

शिवाय या चौकशीत कोणती गडबड आढळली नाही तर तुमचे पैसे तुम्हाला परत केली जातील. त्या महिलेला इतकं घाबरवलं गेलं होतं की तिला 24 तास व्हिडीओ कॉलवर राहण्यास सांगितलं होतं. ती त्या ठगांच्या जाळ्यात अडकली होती. त्यानंतर ती घरातल्या कम्प्युटर समोर एक महिना व्हिडीओ कॉलवर होती. जर कधी कॉल कट झाला तर ते परत व्हिडीओ कॉल करत होते. शिवाय तिच्या लोकशनची माहिती ही ते घेत होते.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे पहिलं मोठं आंदोलन उभं करणार, बैठकीत काय ठरलं?

महिलेवर इतका दबाव टाकण्यात आली की तिला सांगण्यात आलं तू बँकेत जा. तिथून आम्ही दिलेल्या अकाऊंटवर पैसे पाठव. जर कोणी काही विचारणा केली, तर मालमत्ता खरेदी करायची आहे असं सांग. त्यानंतर महिलेने आपल्याकडचे पैसे पाठवून ही दिले. त्यातले 15 लाख त्यांनी त्या महिलेच्या खात्यावर परत पाठवले. त्यातून त्यांनी महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर पतीच्या अकाऊंट वरून पैसे पाठवायला तिला सांगितले. त्यानंतर तिने सहा बँक खात्यातील जवळपास 3.8 कोटी रूपये ठगांच्या खात्यात जमा केले.  

ट्रेंडिंग बातमी -  आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळणार? भास्कर जाधवांच्या पत्रात नेमकं काय?

मात्र पाठवलेले पैसे पहिल्या प्रमाणे त्या महिलेच्या खात्यात जमाच झाले नाहीत. त्यानंतर महिलेला शंका निर्माण झाली. हे असं कसं झालं हा प्रश्न तिला पडला. त्याच वेळी हे सायबर ठग तिच्याकडून आणखी पैशांची मागणी करू लागले. त्यानंतर त्या वृद्ध महिलेने आपल्या परदेशात असलेल्या मुलांना ही बाब सांगितली. त्यांनी तातडीने त्यांना पोलिसात जाण्यास सांगितलं. त्यानंतर हीबाब त्या वृद्ध महिलेने पोलिसांना सांगितली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याचा शोध आता पोलिस घेत आहेत.