65 वर्षांच्या प्रेयसीच्या घरी पोहोचला 45 वर्षाचा प्रियकर, शारीरिक संबंधला नकार देताच घडलं भयंकर!

Love affair with old women : एका 45 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 65 वर्षांच्या प्रेयसीची हत्या केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Love affair with old women : एका 45 वर्षीय व्यक्तीने त्याच्या 65 वर्षांच्या प्रेयसीची हत्या केली. महिलेने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्याने हे कृत्य केले. पोलिसांनी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. दिनेश कुमार सेन असं या आरोपीचं नाव असून त्यानं हा गुन्हा कबुल केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

'नवभारत टाईम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 65 वर्षांच्या सावरी देवी 25  रोजी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या गळ्यात कपड्याचा तुकडा बांधलेला होता आणि त्यांचे कपडे अस्ताव्यस्त होते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

पोलिसांनी सखोल तपासानंतर दिनेश कुमार सेनला अटक केली. चौकशीदरम्यान, दिनेशने त्याचा गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की सावरी देवीला कोणतीही संतती नव्हती. लग्नाच्या 6-7 वर्षांनंतरच तिच्या पतीने तिला सोडून दिले होते.

Advertisement

( नक्की वाचा :  Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) राजेश कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,  सावरी देवी तिच्या सासरी एका वेगळ्या मातीच्या घरात एकटी राहत होती. दिनेश तिला दूध आणि इतर आवश्यक वस्तू पोहोचवत असे. हळूहळू दोघांमध्ये प्रेम आणि शारीरिक संबंध निर्माण झाले.

दिनेशने पोलिसांना सांगितले की, तो आणि सावरी देवी रात्री अनेकदा फोनवर बोलत असत. कधीकधी तो मध्यरात्री तिच्या घरीही जात असे. 23 मे रोजी रात्री सुमारे 10 वाजता तो तिच्याशी फोनवर बोलल्यानंतर तिच्या घरी गेला. त्याने सावरी देवीला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. परंतु सावरी देवीने  खराब तब्येतीचे कारण देत नकार दिला.

दिनेशला वाटले की सावरी देवी बहाणा करत आहे. त्यामुळे त्याने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण सावरी देवीने त्याला ढकलून दिले. रागाच्या भरात दिनेशने कपड्याच्या तुकड्याने तिचा गळा दाबला. अटकेच्या भीतीने दिनेशने सावरी देवीचा मोबाईल फोन हिसकावला. त्याने तो आपल्या घराशेजारच्या नाल्यात फेकून दिला. दिनेशच्या कबुलीजबाबाच्या आधारे पोलिसांनी सावरी देवीचा मोबाईल फोन जप्त केला आहे.

Advertisement

( नक्की वाचा :  Love Affair : 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली शिक्षिका, नवरा आणि 3 मुलांना सोडलं, वाचा पुढे काय झालं.... )

पोलिसांनी सांगितले की, कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिनेशला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. 
 

Advertisement

Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world