जाहिरात

Love Affair : 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली शिक्षिका, नवरा आणि 3 मुलांना सोडलं, वाचा पुढे काय झालं....

Love Affair : एखादी व्यक्ती एकदा प्रेमात पडली, तिचं कुणावर मन जडलं की स्वत:ला सांभाळता येत नाही असं म्हणातात. संजू देवी या खासगी शाळेतील शिक्षिकेबाबतही हेच झाले.

Love Affair : 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली शिक्षिका, नवरा आणि 3 मुलांना सोडलं, वाचा पुढे काय झालं....
12 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसाठी 3 मुलं आणि नवऱ्याला सोडलं
मुंबई:

Love Affair : एखादी व्यक्ती एकदा प्रेमात पडली, तिचं कुणावर मन जडलं की स्वत:ला सांभाळता येत नाही असं म्हणातात. संजू देवी या खासगी शाळेतील शिक्षिकेबाबतही हेच झाले. त्या 12 वर्षांनी लहान असलेल्या शेजाऱ्याच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर आपण विवाहित आहोत, आपल्याला तीन मुले आहेत, हे देखील संजू देवीला आठवले नाही. प्रेमाच्या आहारी गेलेल्या संजूने त्यांचा पती आणि मुलांना सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिथे तासनतास हाय व्होल्टेज ड्रामा रंगला. या प्रेम प्रकरणाची संपूर्ण बिहारमध्ये चर्चा आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

बिहारमधील जमूई जिल्ह्यातल्या मलयपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार ( (Bihar Love Affair) घडला आहे. 35 वर्षांच्या संजू देवीचे रामू रावत यांच्याशी लग्न झाले होते. संजूची मोठी मुलगी सिमरन 12 वर्षांची आहे. दुसरी मुलगी स्वीटी 11 वर्षांची आणि मुलगा समीर 10 वर्षांचा आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर संजू देवीला पुन्हा एकदा प्रेम झाले आहे. लोकलज्जा आणि कुटुंबाचा मोह बाजूला सारून महिला शिक्षिकेने आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. सोमवार संध्याकाळी ती शेजारी राहणाऱ्या तिचा प्रियकर कन्हैया कुमारच्या घरी गेली. दोघांच्या वयात खूप फरक आहे. शिक्षिकेचे वय 35 वर्षे आहे तर तिचा प्रियकर फक्त 23 वर्षांचा आहे.

एक्सप्रेस-वे वर महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत सापडले भाजपा नेते, CCTV मध्ये झालं सर्व रेकॉर्ड

( नक्की वाचा :  एक्सप्रेस-वे वर महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत सापडले भाजपा नेते, CCTV मध्ये झालं सर्व रेकॉर्ड )

प्रियकरासोबत राहण्यासाठी पोहोचली आणि 

कन्हैयाचे कुटुंब मात्र दोघांच्या या नात्याच्या विरोधात आहे. पण मुलाचे म्हणणे आहे की दोघांचे नाते 12 वर्षांपासूनचे आहे. गावातील लोकांना या प्रेमकहाणीबद्दल कळताच त्यांच्या घराबाहेर गर्दी जमा झाली. मात्र, प्रियकर कन्हैयाच्या आईने संजूला घरात ठेवण्यास स्पष्टपणे नकार दिला. तिथे तासनतास हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.

( नक्की वाचा : 15 दिवसांची बायको ! 'या' मुस्लीम देशात धडाधड होत आहेत लग्न! वाचा काय आहे भानगड? )
 

स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती मलयपूर पोलिस स्टेशनला दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये नेले. सोमवारी दोन्ही पक्षांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण शिक्षिका आणि तिचा प्रियकर दोघेही त्यांच्या निर्णयावर ठाम होते. पोलीस स्टेशन प्रमुख विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही सज्ञान आहेत. आपापसात सामंजस्य करून रात्री त्यांना कुटुंबीयांसोबत पाठवण्यात आले. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com