Odisha News : ओडिशाच्या केंद्रापाडा जिल्ह्यात लव्ह जिहादशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक विवाहित मुस्लीम तरुण स्वत:ला अविवाहित असल्याचं सांगत एकामागून एक हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांच्याशी लग्न करीत होता. आतापर्यंत त्याने दोन तरुणींना लव्ह जिहादमध्ये अडकवल्याचा आरोप आहे.
हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाह करण्यासाठी मुसलमान संघटना दहा लाख रुपयांची मदत करीत होती. एका मुस्लीम महिलेने पतीवर हा आरोप केला आहे. तिने केंद्रापाडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
मुस्लीम महिलेने पतीविरोधात पोलिसात दाखल केली तक्रार...
महिलेने तिचा पती सईजुद्दीन खान विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर तपास सुरू केला आहे. तक्रारदाराने एसपींना तक्रारीत म्हटलंय, २०२० मध्ये त्यांचं लग्न झालं. दाम्पत्यांना एक मुलगा आहे. मुलाच्या जन्मानंतर साधारण दोन वर्षांनी सईजुद्दीन त्यांना सोडून निघून गेला.
हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून विवाहाचा आरोप...
महिलेने आरोप केला आहे की, मला सोडून गेल्यानंतर पतीने दुसऱ्या हिंदू तरुणीला फसवून तिच्याशी लग्न केलं. तक्रारीत तिने म्हटलंय, सईजुद्दीन याने अनेकदा स्वत:ला अविवाहित असल्याचं सांगून तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवलं.
महिलेने आरोप केला आहे की, मुसलमान संघटना हिंदू समुदायातील तरुणींशी लग्न करण्यासाठी प्रत्येक लग्नामागे दहा लाखांची रक्कम देत होते. ती पुढे म्हणाली, माझ्या पतीने अशा प्रकारे दोन हिंदू महिलांशी लग्न करीत एकूण २० लाखांची रुपये मिळवली होती. सईजुद्दीन विवाहित असताना त्याने स्वत:ला अविवाहित असल्याचं सांगून निर्दोष हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवले आणि लग्न केलं. पैसे मिळाल्यानंतर तो त्या मुलीला सोडून देत होता.
आरोपीने हैदराबादला घेऊन गेलेल्या नागपुरा परिसरातील तरुणीच्या वडिलांनी केंद्रपाडा पोलीस अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी आरोपीवर त्यांच्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप केला. केंद्रपाडा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कटारिया यांनी सांगितलं की, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे आणि पोलीस तपास करत आहेत, त्यांनी असंही सांगितलं की, वस्तुस्थिती पडताळून पाहिल्यानंतर कायद्यानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल.