जाहिरात

Video: 'जळा आणि धूर काढा', मल्याच्या वाढदिवशी ललित मोदीची मस्ती, भारतीय यंत्रणांची उडवली थट्टा

Lalit Modi Shares Controversial Video from Vijay Mallya's Birthday Party: आयपीएलचा संस्थापक ललित मोदी याने विजय मल्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Video: 'जळा आणि धूर काढा', मल्याच्या वाढदिवशी ललित मोदीची मस्ती, भारतीय यंत्रणांची उडवली थट्टा
Lalit Modi and Vijay Mallya : ललित मोदीनं विजय मल्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मुंबई:

Lalit Modi Shares Controversial Video from Vijay Mallya's Birthday Party: भारतातील दोन सर्वात मोठे फरार उद्योगपती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा पुन्हा एकदा चर्चेला उधाण येणे स्वाभाविक आहे. आयपीएलचा संस्थापक ललित मोदी याने विजय मल्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यात त्याने स्वतःचा आणि मल्याचा उल्लेख भारताचे सर्वात मोठे फरार असा केला आहे. 

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून नेत्यांपासून सामान्य जनतेपर्यंत सर्वजण यावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.

विजय मल्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

विजय मल्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका खास पार्टीत ललित मोदी सहभागी झाला होता. या पार्टीदरम्यान ललित मोदीने एक व्हिडिओ शूट केला आणि तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. 

या व्हिडिओमध्ये ललित मोदी हसत हसत म्हणतोय की, आम्ही दोघे भारताचे सर्वात मोठे फरार आहोत. या विधानानंतर त्याने इंटरनेटवर पुन्हा एकदा खळबळ उडवून देण्याबद्दल कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्याने लोकांना उद्देशून म्हटले आहे की, हे पाहून तुम्हाला नक्कीच हेवा वाटेल.

( नक्की वाचा : Video: भारताचा पराभव होताच पाकिस्तानी फॅन्सची मुजोरी; 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला घेरलं, पाहा त्याचं उत्तर )
 

नेटकऱ्यांचा संताप 

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ललित मोदी आणि विजय मल्या यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, या लोकांनी भारतीय सरकारची थट्टा मांडली आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, भारतीय तपास यंत्रणा सीबीआय आणि ईडी यांच्यावर हे लोक हसत आहेत. 

अनेक भारतीयांनी या व्हिडिओला देशाच्या कायद्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे. या दोघांच्या अशा वागण्यामुळे सोशल मीडियावर संतापाचे वातावरण निर्माण झाले असून कायद्याच्या कडक अंमलबजावणीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

( नक्की वाचा : Nostradamus: 2026 मध्ये मृत्यू बनून येणार मधमाश्या? नास्त्रेदमसच्या त्या एका भविष्यवाणीने वाढवली जगाची धडधड )

ललित मोदी आणि विजय मल्याचा इतिहास

विजय मल्याला जानेवारी 2019 मध्ये विशेष न्यायालयाने प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट अंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. मल्यावर विविध बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवल्याचा आणि मनी लाँडरिंगचा आरोप आहे. तो मार्च 2016 मध्ये भारत सोडून लंडनला पळून गेला होता. 

दुसरीकडे, आयपीएलचा माजी कमिशनर ललित मोदी 2010 मध्येच भारत सोडून पळाला होता. त्याच्यावर करचोरी, मनी लाँडरिंग आणि आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क मिळवून देण्यासाठी तब्बल 125 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे.

हे दोन्ही हाय प्रोफाइल गुन्हेगार परदेशात बसून भारताच्या व्यवस्थेला अशा प्रकारे उघडपणे आव्हान देत असल्याने सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. भारताने या दोघांच्या प्रत्यार्पणासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, मात्र अद्याप त्यात यश आलेले नाही. 

अशातच ललित मोदीने शेअर केलेला हा व्हिडिओ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. या व्हिडिओमुळे आता पुन्हा एकदा भारताच्या प्रत्यार्पण धोरणावर आणि कायद्याच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com