जाहिरात

पार्टी, दारू आणि रक्ताचा खेळ! अभिनेत्रीच्या आयुष्यात 'दुसरा' आला आणि 'पहिल्या'चा घात झाला; असा रचला हत्येचा कट

Love Triangle Turns Deadly:  एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं प्रेम प्रकरण आणि त्यातून रचलेला हत्येचा थरारक कट समोर आला आहे

पार्टी, दारू आणि रक्ताचा खेळ! अभिनेत्रीच्या आयुष्यात 'दुसरा' आला आणि 'पहिल्या'चा घात झाला; असा रचला हत्येचा कट
Love Triangle Turns Deadly: . बिंदू ही मोहन राव नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Love Triangle Turns Deadly:  एका प्रसिद्ध अभिनेत्रीचं प्रेम प्रकरण आणि त्यातून रचलेला हत्येचा थरारक कट समोर आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या जोडीदाराचा अडसर दूर करण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने जो प्लॅन आखला, तो ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. या घटनेत केवळ हत्याच केली नाही, तर पुरावे नष्ट करण्यासाठी आणि पकडले जाऊ नये म्हणून अनेक दिवस घर बाहेरून बंद ठेवण्यात आले होते.

एका पार्टीच्या बहाण्याने बोलावून, दारूच्या नशेत असताना या तरुणावर वार करण्यात आले. जेव्हा तो मदतीसाठी ओरडू लागला, तेव्हा या अभिनेत्रीने क्रूरपणाची सीमा ओलांडली. तिने स्वतःच्या हाताने त्याच्या तोंडावर आणि नाकावर चिकटपट्टी (टेप) लावली, जेणेकरून त्याचा आवाज बाहेर जाऊ नये. हात-पाय बांधून त्याला इतकी अमानवी वागणूक दिली की गुदमरून त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरली असून हे थरारनाट्य कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगलुरु मधील मंजुनाथननगर परिसरात घडले आहे.

(नक्की वाचा : Pune News : आधी चारित्र्यावर शिंतोडे, मग DNA चाचणी आणि अखेर अंगावर काटा आणणारा निकाल; 'या' प्रकरणाने सर्व हादरले )

काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील मुख्य आरोपी उर्मिला उर्फ बिंदू ही कन्नड सिनेसृष्टीतील एक ओळखीचा चेहरा आहे. तिने भजरंगी, पोलीस क्वार्टर्स आणि कालभैरव यांसारख्या प्रसिद्ध कन्नड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. बिंदू ही मोहन राव नावाच्या तरुणासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

मात्र, त्याच वेळी तिचे विनय नावाच्या दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. बिंदू आणि विनय यांना लग्न करायचे होते, पण त्यांच्या या नात्यात मोहन राव हा मोठा अडसर ठरत होता. याच अडथळ्याला कायमचे दूर करण्यासाठी या दोघांनी हत्येचा कट रचला.

( नक्की वाचा : Dombivli News: माझ्या खात्यात 2 कोटी 60 लाख आले कुठून? तरुणीच्या प्रश्नानं डोंबिवलीत खळबळ, वाचा काय आहे प्रकरण )

पार्टीच्या नावाखाली रचला मृत्यूचा सापळा

 या कटाची अंमलबजावणी 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. बिंदू आणि मोहन ज्या घरात एकत्र राहत होते, तिथेच एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीला विनय आणि त्याचा मित्र धनुष यांनाही बोलावण्यात आले होते. सर्वजण मद्यप्राशन करत असताना, अचानक विनय आणि धनुषने मोहन राववर हल्ला केला. त्यांनी मोहनवर चाकूने सपासप वार केले. 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मोहन जेव्हा जीवाच्या आकांताने ओरडू लागला, तेव्हा बिंदूने धावत जाऊन त्याच्या तोंडावर आणि नाकावर घट्ट टेप गुंडाळला. त्याचे हात-पाय बांधून त्याला हतबल करण्यात आले. जखमा आणि गुदमरल्यामुळे अखेर मोहन रावचा तिथेच मृत्यू झाला.

12 दिवसांनंतर गुपित उघड झाले

हत्या केल्यानंतर तिन्ही आरोपींनी घराला बाहेरून कुलूप लावले आणि तिथून पळ काढला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी हे घर पूर्णपणे बंद ठेवले होते. मात्र, मृतदेह घरातच सडत गेल्यामुळे साधारण 12 दिवसांनंतर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरू लागली. शेजाऱ्यांनी या दुर्गंधीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना मोहन रावचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.

पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत अभिनेत्री बिंदू, तिचा प्रियकर विनय आणि मित्र धनुष या तिघांनाही अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com