जाहिरात

'रामलीले'त रावण व्हायचा, क्राइम थ्रिलर वेब सीरिजचंही वेड; वडिलांचे तुकडे करणाऱ्या अक्षयचा भयाण भूतकाळ

Lucknow Murder Case : अक्षत रीयल लाइफमध्ये कोणत्याही चित्रपटातील खलनायकाप्रमाणे वागायचा, असं त्याचे शेजारी सांगतात. २१ वर्षीय अक्षतला क्राइम थ्रिलर वेब सीरिज पाहण्याचं वेड होतं.

'रामलीले'त रावण व्हायचा, क्राइम थ्रिलर वेब सीरिजचंही वेड; वडिलांचे तुकडे करणाऱ्या अक्षयचा भयाण भूतकाळ
  • लखनऊ में दवा और शराब कारोबारी मानवेन्द्र सिंह की हत्या के मामले में उनका बेटा अक्षत प्रताप सिंह आरोपी है
  • अक्षत को क्राइम थ्रिलर वेब सीरीज देखने का शौक था और रामलीला में वह रावण का किरदार निभाता था
  • आरोपी को पिता के शराब और दवा के कारोबार से ऐतराज था और उसने चार साल पहले बिजनेस बदलने की चेतावनी दी थी
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Lucknow Ashiyana Murder Case: लखनऊमधील आशियाना भागात मद्य व्यापारी मानवेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा अक्षत प्रताप सिंह याला अटक करण्यात आली आहे. या घटनेतील धक्कादायक माहिती आता समोर येत आहेत.

खऱ्या आयुष्यातला 'व्हिलन'

२१ वर्षांचा अक्षत प्रताप सिंह खऱ्या आयुष्यात एखाद्या चित्रपटातील खलनायकाप्रमाणे वागायचा. त्याला गुन्हेगारीवर आधारित क्राइम, थ्रिलर वेब सिरीज पाहण्याचं प्रचंड वेड होतं. विशेष म्हणजे, स्थानिक रामलीलेमध्ये तो 'रावणा'ची भूमिका साकारत असे. शेजाऱ्यांच्या मते, त्याला नायकापेक्षा खलनायकाच्या भूमिकांमध्ये जास्त रस होता.
Latest and Breaking News on NDTV

वडिलांच्या व्यवसायाचा तिरस्कार

पोलीस तपासातील माहितीनुसार, अक्षतला आपल्या वडिलांच्या मद्य व्यवसायाचा प्रचंड तिरस्कार होता. वडिलांनी हा व्यवसाय सोडून दुसरा कोणताही व्यवसाय करावा, अशी त्याची इच्छा होती. चार वर्षांपूर्वी तो ६ पानांचे पत्र लिहून घरातून पळून गेला होता. यावेळी पत्रात त्याने वडिलांना व्यवसाय बदलण्याची ताकीद दिली होती. आपल्याला मेडिकलचे शिक्षण घ्यायचं नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

घरकाम करणाऱ्या महिलेला गोवण्यासाठी रचला कट...

हत्या करण्यापूर्वी अक्षतने स्वतःच्याच घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. मात्र, भविष्यात कोणाला आपल्यावर संशय येऊ नये, म्हणून त्याने या चोरीचा आळ घरात काम करणाऱ्या महिलेवर  घातला होता.

व्हाट्सएप ग्रुप बनवून लोकांची दिशाभूल

वडिलांची हत्या करून त्यांचा मृतदेह एका ड्रममध्ये लपवल्यानंतर, अक्षतने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये तो नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना वडिलांच्या 'बेपत्ता' असण्याबाबत सतत अपडेट्स देत होता. लोकांच्या मनात स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण व्हावी आणि आपण एक असहाय्य मुलगा आहोत, असं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता.

क्रूरतेचा कळस

तपासातून असंही समोर आलं आहे की, त्याने वेब सीरिज पाहून पुरावे नष्ट करण्याचे मार्ग शोधले होते. त्याने वडिलांच्या शरीराचे तुकडे केले आणि धड ड्रममध्ये भरले, मात्र डोके गायब केले. पोलीस सध्या त्याला कोठडीत घेऊन गायब असलेल्या शिराचा शोध घेत आहेत. या प्रकरणात एक नवीन वळण असेही समोर आले आहे की, अक्षत जेव्हा वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे करत होता, तेव्हा त्याच्या बहिणीने ते पाहिले होते. पण ती भीतीपोटी गप्प राहिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com