Lucknow: बाप की कसाई? हाडं मोडली, गळा दाबला, बापाने 4 वर्षांच्या अर्णवची केली हत्या; शरीरावर जखमांच्या खुणा

Lucknow News: लखनौमध्ये 4 वर्षांच्या अर्णवची त्याच्याच पित्याने आणि सावत्र आईने निर्घृण हत्या केली. शरीरावर 18 जखमा आणि गळा दाबून खून केल्याचा खुलासा पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये झाला आहे. कस्टडीच्या नावाखाली बापाने मुलाची हत्या केली. वाचा या मन सुन्न करणाऱ्या घटनेचा संपूर्ण रिपोर्ट.

जाहिरात
Read Time: 4 mins
"Lucknow Father Killed Son: बापानेच चार वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या केली"
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • लखनौमध्ये बापानंच चार वर्षांच्या लेकाची हत्या
  • मुलाच्या शरीरावर आढळल्या 18 गंभीर जखमांच्या खुणा
  • क्रूर बाप चार वर्षांच्या मुलाला करायचा मारहाण
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
लखनौ:

Lucknow News: एखादा बाप असाही असू शकतो का? बापासाठी तर मुल त्याचा अभिमान आणि गर्व असतो. आपल्या मुलासाठी तो संपूर्ण जगाशी लढतो, पण लखनौच्या या कलयुगी बापाने आपल्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाचाच जीव घेतला आहे. या गुन्ह्यात त्याला साथ देणारी त्याची दुसरी पत्नी म्हणजेच मुलाची सावत्र आई देखील तितकीच दोषी आहे. मुलाच्या शरीरावर 18 गंभीर जखमांच्या खुणा, फ्रॅक्चर आणि पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या केल्याचा उल्लेख आहे. बापाच्या या क्रूरतेमुळे आज माणुसकी देखील काळिमा फासला गेलाय. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकला अर्णव आपल्या आजीच्या घरी राहत होता, मग अचानक बापाला असा कोणता पुळका आला की त्याने कस्टडीच्या नावाखाली मुलाला घरी नेले आणि त्याची हत्याच केली? जाणून घेऊया या मन सुन्न करणाऱ्या गुन्ह्याबाबत 

काय आहे संपूर्ण प्रकरण? |  Lucknow Crime News

हे प्रकरण लखनौच्या चौक परिसरातील आहे, जेथे चार वर्षांच्या अर्णवचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह बाथरूममध्ये आढळला, पण पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासे झाले आहेत. अर्णवच्या शरीरावर 18 गंभीर जखमा, हाडे तुटलेली आणि गळा दाबून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अर्णवचा पिता भीष्म याने मुलाला चांगले संगोपन देण्याचे कारण सांगून कोर्टाकडून कस्टडी मिळवली होती. आईच्या मृत्यूनंतर अर्णव कानपूरला त्याच्या आजीकडे राहत होता. या प्रकरणात लखनऊ पोलिसांनी वडील भीष्म खरबंदा आणि सावत्र आई रागिणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Advertisement

सावत्र आईचा छळ आणि बापाचा बनाव

अर्णवच्या मामाच्या कुटुंबाने भीष्म आणि रागिणीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कोर्टात असतानाही अर्णव खूप शांत आणि घाबरलेला असायचा. कोणाशीही बोलत नसे. भीष्म त्याला कोणाला भेटूही देत नसे. अनेकदा फोन केल्यावर तो व्हिडीओ कॉलवर फक्त अर्णव जवळ असल्याचे दाखवायचा, पण त्याचे बोलणे करून देत नसे आणि कॉल म्युट करायचा, अशी माहिती अर्णवच्या मामाच्या कुटुंबीयांनी NDTVशी बातचित करताना सांगितली. 

वडिलांकडे गेल्यानंतर अर्णव पूर्णपणे बदलला होता. शरीरावरील जखमा लपवण्यासाठी भर उन्हाळ्यातही बाप त्याला पूर्ण बाह्यांचे कपडे घालायला लावायचा. सावत्र आई आणि बाप दोघेही त्याला मारहाण करत असत. जेव्हा नातेवाईकांनी जखमांबद्दल विचारले, तेव्हा रागिणी काहीतरी खोटे कारण सांगून वेळ मारून न्यायची.

कोर्टाची दिशाभूल आणि हत्या

भीष्म आणि कानपूरची स्वाती यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी एका मॅट्रिमोनिअल साइटच्या माध्यमातून झाला होता. अर्णवच्या जन्मानंतर अवघ्या सहा महिन्यांत स्वातीचा मृत्यू झाला. त्यानंतर अर्णवचा मामा रोहित त्याला आपल्या घरी घेऊन आला. सुमारे एका वर्षानंतर भीष्मने रागिणीशी दुसरे लग्न केले. रागिणीला पहिल्या लग्नापासून एक मुलगी होती, तर भीष्म आणि रागिणीला आता एक वर्षाचा मुलगा आहे. मुलाच्या कस्टडीसाठी कोर्टात खटला सुरू होता. कोर्टाच्या आदेशानुसार, 13 ऑगस्ट 2023 रोजी भीष्म अर्णवला आपल्या घरी घेऊन आला. पण अर्णवला काय ठाऊक होते की ज्या बापाकडे तो जात आहे, तिथेच त्याचं आयुष्य कायमचं संपणार आहे. अर्णवच्या मावशीने सांगितले की, त्यांच्या बहिणीचा (स्वाती) मृत्यूही योग्य उपचार न मिळाल्याने झाला होता. मुलाच्या शरीरावर जखमांच्या कित्येक खुणा होत्या. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्येही धक्कादायक माहिती समोर आली, ज्यामध्ये एकूण 18 जखमांच्या खुणा, कित्येक हाडे मोडलेली आणि गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. 

(नक्की वाचा: Latur News: वर्षभरात 189 अल्पवयीन मुली बेपत्ता, गायब होण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर, सर्वच हादरले)

मेहुण्याला फोन करून सांगितलं की, बाथरूममध्ये पडून अर्णवचा मृत्यू 

अर्णवचा मृत्यू झाल्यानंतर भीष्मने आपल्या मेव्हण्याला (रोहित) फोन करून सांगितले की, "अर्णवची तब्येत बिघडली होती, त्याला उलट्या-जुलाब होत होते. तो बाथरूममध्ये गेला आणि बराच वेळ बाहेर आला नाही. जाऊन पाहिले तर तो खाली पडला होता आणि त्याचा श्वास थांबला होता." मात्र रोहितला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. जेव्हा त्याने घरी जाऊन अर्णवला पाहिले, तेव्हा त्याच्या शरीरावर मारहाणीच्या अनेक जुन्या आणि नवीन जखमा स्पष्ट दिसत होत्या.

Advertisement
पहिल्या पत्नीच्या बहिणीशी लग्न लावून देण्याची आरोपी पित्याची मागणी 

स्वातीच्या मृत्यूनंतर भीष्मने तिच्या धाकट्या बहिणीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. "ती अर्णवचा चांगला सांभाळ करेल," असे कारण सांगून त्याने सासरच्यांवर दबाव टाकला होता. पण सासरच्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. कारण त्यांनी आपली मुलगी गमावली होती. 

(नक्की वाचा: Ratnagiri Crime: इंटरनेटवर मुलाचाच नको तो VIDEO दिसला, पित्याच्या पायाखालची जमीन सरकली; नराधमांची भयंकर विकृती)

नातवाला भेटण्यासाठी आजी व्याकुळ

कस्टडी मिळाल्यानंतर भीष्मने अर्णवला त्याच्या आजी-आजोबांपासून पूर्णपणे तोडले होते. त्याची वृद्ध आजी आपल्या नातवाला भेटण्यासाठी व्याकुळ होती. अनेकदा त्या कानपूरहून लखनौला आल्या, पण भीष्मने त्यांना लांबूनच अर्णवला दाखवून परत पाठवले.

Advertisement