संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Madha Crime: माढा तालुक्यात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून ही मारहाणीची घटना घडली असून आठ ते दहा लोक गंभीर जखमी झाली आहेत. याप्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
माढ्यात राडा, डोकी फोडली
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माढा तालुक्यातील चिंचोली परिसरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. किरकोळ वादातून ही हाणामारीची घटना घडली. यामध्ये सात ते आठ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींंमध्ये काही महिलाही जखमी झाल्या आहेत.याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी मोरे यांचे पती मुन्ना मोरे यांच्यासह बावी गावातील चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यामध्ये दुसऱ्या गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास सध्या सुरु आहे.
अकोल्यात दोन गटात वाद
दुसरीकडे, अकोल्याच्या जुने शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात रविवारी रात्री दोन गटांमध्ये जुना वाद पुन्हा उफाळून आला. या वादाचे रूप दगडफेकीत झाले असून काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीदरम्यान एका घराच्या शौचालयाची खिडकी तुटल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आला आहे.
US Israel Iran War : तेल, गॅसपाठोपाठ आता थेट पाण्यावर 'वार'; तीव्र पाणीसंकट निर्माण होण्याची भीती
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world