जाहिरात

Wardha News: NCP नेत्याकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार, नोकरीच्या आमिषाने 5 वर्ष दुष्कृत्य; अश्लील फोटोही पाठवले

आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा सातत्याने छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धाडस दाखवत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Wardha News: NCP नेत्याकडून तरुणीवर लैंगिक अत्याचार, नोकरीच्या आमिषाने 5 वर्ष दुष्कृत्य; अश्लील फोटोही पाठवले

निलेश बंगाले, वर्धा: 

Wardha Crime:  महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्राला सुन्न करणारी एक अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक घटना वर्ध्यामधून समोर आली आहे. वर्ध्यात राष्ट्रवादीच्या नेत्याने नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवाकर गमे असे राष्ट्रवादीच्या नेत्याचे नाव असून तो या मुलीचे 5 वर्षांपासून शोषण करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लैंगिक शोषण 

 वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून गेल्या पाच वर्षांपासून तिचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका स्थानिक नेत्याला पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. दिवाकर गमे असे या आरोपीचे नाव असून तो राजकीय वर्तुळातील बड्या नेत्यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

Satara News : 500 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं, यंदाच्या बगाड यात्रेची जगभरात चर्चा; कारण काय?

आरोपी दिवाकर गमे याने पीडित तरुणीला नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दिले होते. मात्र, या आमिषाचा गैरफायदा घेत त्याने गेल्या पाच वर्षांपासून पीडितेचे शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू ठेवले. इतकेच नव्हे तर, आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून तिचा सातत्याने छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धाडस दाखवत पुलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आरोपी अटकेत

​घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दिवाकर गमे याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि 'पॉक्सो' (POCSO) कायद्यातील विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन जप्त केला असून, त्यातील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.

नक्की वाचा - Bavdhan Bagad: धन्य ते बंधुप्रेम! 16 वर्षांपूर्वी नवस, नाथाचा कौल, कसं असतं बावधनचे बगाड? 300 वर्षांची परंपरा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com