Madha News: 'हॉटेल 7777' च्या मालकाची मुजोरी! कर्मचाऱ्याला सर्वांसमोर नग्न करुन बेदम मारलं, VIDEO व्हायरल

आम्ही फॅमिलीसारखे राहतो. दादांचे नाव बदनाम केले जात आहे, असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी:

Hotel 7777 Owner Beat Worker Viral Video:  सोलापूर जिल्ह्यातील हॉटेल 7777 हे नाव सोशल मीडियावर चांगलेच  प्रसिद्ध आहे.  नॉनव्हेज प्रेंमींचे आवडीचे हॉटेल म्हणून ७७७७ ची ओळख आहे. हॉटेलचे मालक लखन मानेंच्या रिल्सची माध्यमांमध्ये जोरदार चर्चा होत असते. मात्र सध्या हॉटेल 7777 मध्ये एका कर्मचाऱ्याला नग्न करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावातील प्रसिद्ध हॉटेल 7777 च्य मालकाचा मुजोरपणा समोर आला आहे. हॉटेल ७७७७ च्या मालकाने आपल्या एका कर्मचाऱ्याला नग्न करुन पाईपने मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून सर्वांसमोर या कर्मचाऱ्याला नग्न करुन मारण्यात आले. 

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर आता हॉटेलचे मालक लखन माने यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या व्हिडिओ जुना असून तो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच याबाबत मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. 

Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट

कर्मचाऱ्याचे स्पष्टीकरण..

मी आठ महिन्यांपासून या हॉटेलमध्ये कामाला आहे. घटनेच्या दिवशी मी ड्रिंक केली होती आणि नग्न अवास्थेत होतो. त्यामुळेच मला दादांनी शिक्षा दिली होती. मी काम इथेच करणार आहे.  मात्र आमचे भावांसारखे नाते आहे, तो व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे. आम्ही फॅमिलीसारखे राहतो. दादांचे नाव बदनाम केले जात आहे, असं मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.

Advertisement

दुसरीकडे, हा व्हिडिओ मला बदनाम करण्यासाठी व्हायरल केला जात आहे. मी शिक्षा देण्यासाठीच कृत्य केले. आमचे भावासारखे नाते आहे.  मराठी माणूस पुढे चाललेला आहे तर त्याचे पाय कसे खेचायचे ह्या दृष्टिकोनातून आज सर्व सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे, असं हॉटेल मालकाने म्हटलं आहे. दरम्यान, या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 

Advertisement