जाहिरात
This Article is From Jul 17, 2024

पतीसोबत महाबळेश्वरला आलेल्या ज्योती सराफ यांचा अचानक मृत्यू; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सोडला जीव

ज्योती सराफ या पती जयेंद्र सराफ यांच्यासमवेत महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या.

पतीसोबत महाबळेश्वरला आलेल्या ज्योती सराफ यांचा अचानक मृत्यू; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सोडला जीव
महाबळेश्वर:

महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी 15 जुलै रोजी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. यानंतर त्यांना महाबळेश्वर येथील रूग्णालयात दाखल केलं. मात्र येथे उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. महाबळेश्वरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या ज्योती जयेंद्र सराफ (वय 53) यांचा श्वसनाच्या त्रासाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. ज्योती सराफ या पती जयेंद्र सराफ यांच्यासमवेत महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या.

येथे आल्यानंतर शहरानजीक असलेल्या हॉटेल क्लब महिंद्रा शेरवुड येथे मुक्कामास होते. सोमवारी 15 जुलै रोजी रात्री ज्योती सराफ यांना अस्वस्थ वाटू लागले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मृत महिलेचे पती जयेंद्र सराफ यांनी याबाबतची याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात माहिती दिली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. 

बातमी अपडेट होत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com