- महाराष्ट्र सायबर विभागाने सोशल मीडियावर बनावट नोटा विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे
- आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे
- आरोपी सोशल मीडियावर आकर्षक रिल्सद्वारे कमी किंमतीत जास्त परतावा देण्याचा फसव्या योजनेचा प्रचार करत होते
सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट नोटांची (FICN) विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा महाराष्ट्र सायबर विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुम्ही सोशल मीडियावर रिल्स पाहून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असाल, तर सावधान. इन्स्टाग्रामवर बनावट नोटा विकणाऱ्या एका टोळीचा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात दोन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून राज्यभरात 4 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
अनेक दिवसांपासून इन्स्टाग्रामवर काही संशयास्पद खाती सक्रिय होती. या खात्यांवरून आकर्षक रिल्स आणि पोस्ट शेअर करून बनावट नोटा विकण्याचे आमिष दाखवले जात होते. कमी पैशात जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून सर्वसामान्यांना अवैध व्यवहारांकडे ओढले जात होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. महाराष्ट्र सायबरने तातडीने संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नोटीस बजावून आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे आदेश दिले.
तपासाअंती जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यांतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल अनिल पवार आणि योगिता हितेश भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बनावट नोटांचा वापर केवळ आर्थिक गुन्ह्यापुरता मर्यादित नसून, तो दहशतवादी कारवाया आणि मनी लाँडरिंगसाठी केला जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. काही प्रोफाइल्सवरून बनावट भारतीय चलनी नोटांचा प्रचार केला जात असल्याची माहिती सायबर विभागाला मिळाली होती. हे लोक रिल्सच्या माध्यमातून फसव्या योजना सांगून तरुणांना जाळ्यात ओढत होते. सायबर पोलिसांनी या खात्यांची माहिती काढून ती तत्काळ बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली.
बुलढाण्यातील जळगाव जामोद आणि जळगावमधील मुक्ताईनगर येथे या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. राहुल पवार आणि योगिता भोसले या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.अशा कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबरने केले आहे. टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामवरील संशयास्पद हालचालींवर पोलीस सतत लक्ष ठेवून आहेत. सायबर विभागाने माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार संबंधित खात्यांवर कारवाई केली आहे. तपासादरम्यान असे दिसून आले की, ही टोळी सोशल मीडियाचा वापर करून बनावट चलनाची विक्री करत होती. या गुन्ह्याचे धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीचा आधार घेतला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world