जाहिरात

Cyber Police : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचे महत्त्वाचं पाऊल, 50 सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती

सायबर गुन्ह्यांवर वचक निर्माण करण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत.  कमांड अँड कंट्रोल सेंटर अंतर्गत हेल्पलाईन 1930 आणि राज्यासाठी 1945 हेल्पलाईन क्रमांकाद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे.

Cyber Police : सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकारचे महत्त्वाचं पाऊल, 50 सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती

Mumbai News: सायबर फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तसेच भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यशासन विविध पातळ्यांवर काम करीत आहे. त्यानुसार राज्यामध्ये 50 सायबर पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली असून जिल्हा, आयुक्त स्तरावर सायबर लॅबची स्थापना करण्यात येत आहे. कार्यान्वित झालेल्या लॅबमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.  तसेच जागतिक स्तरावरील अत्याधुनिक आणि क्रांतिकारी उपक्रम महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

जानेवारी ते ‍‍डिसेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र सायबर कार्यालयातील एनसीआरओ पोर्टल व सायबर हेल्पलाईन 1930 वर एकूण 3 लाख 32 हजार 538 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सायबर गुन्ह्यांतील फसवणुकीच्या रक्कमेपैकी 440.37 कोटी रूपये वाचविण्यात आले आहेत. संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार ऑनलाईन होऊ लागल्याने शासनाने नागरिकांची होणारी फसवणूक थांबवण्याच्यादृष्टीने http://cybercrime.gov.in या संकेतस्थळावर आणि टोल फ्री क्रमांक 1930 वर आर्थिक फसवणूक झाल्याबाबत तात्काळ तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नॅशनल क्राईम रिर्पोंटींग पोर्टलवर सन 2024 मध्ये ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई शहरात 2,155, पुणे शहरात 125 व ठाणे शहरात 862  सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर आर्थिक फसवणूक झालेल्या सायबर गुन्ह्यांमध्ये 838 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे व 942 आरोपींना अटक करण्यात आली आहे.  तसेच संपूर्ण राज्यात एकंदरीत सायबर गुन्ह्यांमध्ये 1,936 गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्यामध्ये 1,967 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सायबर गुन्ह्यांवर वचक निर्माण करण्यासाठी नोडल सायबर पोलीस स्टेशन कार्यरत आहेत.  कमांड अँड कंट्रोल सेंटर अंतर्गत हेल्पलाईन 1930 आणि राज्यासाठी 1945 हेल्पलाईन क्रमांकाद्वारे सायबर गुन्ह्यांची तक्रार नोंदणी आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात 5 हजार पोलीसांना सायबर तपास आणि प्रतिबंधात्मक उपायांसाठी प्रशिक्षित करण्यात येणार आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर यांनी कळविले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: