Maharashtra Rain : गेल्या 24 तासांत मराठवाड्यात वीज पडून 4 जणांनी गमावला जीव

मराठवाड्यात 22 पेक्षा अधिक जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला असून एकट्या लातूर जिल्ह्यातील 9 जनावरं वीज पडून मृत्यू झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राज्यभरातील अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसाच्या पाण्यात कांदा तरंगत असल्याचा व्हिडिओ चिंता वाढवणारा आहे. दरम्यान वीज पडून अनेकजण जखमी झाल्याचंही वृत्त आहे.  गेल्या 24 तासांत मराठवाड्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा

मराठवाड्यात 22 पेक्षा अधिक जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला असून एकट्या लातूर जिल्ह्यातील 9 जनावरं वीज पडून मृत्यू झाला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांवर पावसामुळे मोठं संकट उभं राहिलं आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील बाळापुर शिवारात 27 वर्षीय प्रियंका अंबादास काळे यांचा वीज पडून मृत्यू झाला, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जोगवाडा येथे अनिल बद्रीनाथ गायके, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथील सचिन विलास बावसकर तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोठा कोळी येथीलच गणेश प्रकाश जाधव यांचाही वीज पडून मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​Pune Sinhagad Fort : विकेंडला सिंहगडावर जाताय? मग ही बातमी वाचाच, प्रशासनाचा मोठा निर्णय

संपूर्ण राज्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणला 21 रोजी रेड अलर्ट

राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील 27 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. मान्सून भारताच्या सीमेजवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे तो केरळात कधीही दाखल होऊ शकतो. केरळसह तामिळनाडू राज्याला आगामी तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी 20 मे रोजी संपूर्ण राज्याला ऑरेंज अलर्ट तर कोकणला 21 रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
 

Advertisement