
मनिष रक्षमवार, तेलंगणा: गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली, छत्तीसगडसह महाराष्ट्रात नक्षलवाद्यांविरोधात कडक कारवाई सुरु आहे. पोलिसांनी सुरु केलेल्या धडक कारवाईपर्यंत आत्तापर्यंत शेकडो नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अशातच आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली असून तेलंगणामध्ये झालेल्या मोठ्या कारवाईत 20 माओवाद्यांना अटक करण्यात आली असून 8 जणांनी आत्मसमर्पण केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, करेगुट्टा ऑपरेशन संपताच तेलंगणाच्या मुलुगु जिल्ह्यातील पोलिसांनी माओवाद्यांच्या कारवायांविरुद्ध मोठी कारवाई केली. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातून, वाझेडू, वेंकटपुरम आणि कन्नाईगुडम येथून पोलिसांनी एकूण 20 माओवाद्यांना अटक केली आहे. या अटकेत 1 विभागीय समिती सदस्य (डीव्हीसी), 5 क्षेत्र समिती सदस्य (एसीएम) आणि १४ पक्ष सदस्यांचा समावेश आहे.
अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांकडून 03 इन्सास रायफल, 04 एसएलआर रायफल, एक 303 रायफल, मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यातील माओवादी नेटवर्क कमकुवत करण्याच्या दिशेने हे पोलिस ऑपरेशन एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
( नक्की वाचा : नागपूरमध्ये मशीद आणि मदरशाजवळ लागले QR कोड, ATS च्या तपासात काय संशय? )
दरम्यान, मुलुगु जिल्ह्यातही माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाची प्रक्रिया सुरू आहे. एक डीव्हीसीएम, ६ प्लाटून सदस्य आणि १ जनमिलिशिया सदस्याने जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना सरकारच्या पुनर्वसन धोरणांतर्गत मदत दिली जाईल.
Beed Crime: संतोष देशमुख पार्ट- 2 करायचा..,बीडमध्ये तरुणाला लोखंडी रॉड, काठ्यांनी मारहाण
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world