जाहिरात

Beed Crime: संतोष देशमुख पार्ट- 2 करायचा..,बीडमध्ये तरुणाला लोखंडी रॉड, काठ्यांनी मारहाण

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून यावर ठोस पावले उचलत यातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Beed Crime: संतोष देशमुख पार्ट- 2 करायचा..,बीडमध्ये तरुणाला लोखंडी रॉड, काठ्यांनी मारहाण

आकाश सावंत, बीड: बीडच्या परळीती शिवराज नारायण दिवटे या तरुणाला थर्मल रोडवरून टोळक्याने बेदम मारहाण केली होती. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी सकाळी तातडीने कारवाई करत चार जणांना अटक केली. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी शिवराज दिवटे याच्या फिर्यादीवरून परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण घटनेची माहिती स्वतः शिवराट दिवटे याने दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 मी माझ्या मित्रांसोबत अखंड हरिनाम सप्ताहाला गेलो होतो.. त्या ठिकाणी काही लोकांचे भांडण झाले होते. मला त्या संदर्भात माहिती नाही.. परंतु त्यानंतर मी गावी परतत असताना आमच्या दुचाकीला चार-पाच जणांनी अडवले आणि मला दुसऱ्या दुचाकीवर बसून रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात घेऊन गेले.  त्या ठिकाणी मला लाट्या काठ्यांनी मारहाण केली.

मारहाण करताना ते याचा संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत होते. काही लोक माझ्या मदतीला आले. मला त्यांच्या तावडीतून सोडवले नसता त्या पोरांनी मला जिवंत सोडले नसते.. त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हणत शिवराज दिवटे याने घडलेला प्रसंग सांगितला. या घटनेनंतर जखमी असलेल्या शिवराज याची भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी देखील घेतली असून त्यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून यावर ठोस पावले उचलत यातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

( नक्की वाचा : नागपूरमध्ये मशीद आणि मदरशाजवळ लागले QR कोड, ATS च्या तपासात काय संशय? )

दरम्यान, या प्रकरणात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होताच तातडीने पावले उचलत पोलिसांनी तेलगाव येथून चौघांना अटक केली आहे. तर इतर तिघांना परळी परिसरातून ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आले असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

याप्रकरणी परळी संभाजीनगर पोलीस ठाण्यात समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेश गिरी, प्रशांत कांबळे, सन्मित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वगळकर, सुरज मुंडे, स्वराज्य गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवर बीएनएस कलम 109, 126(2), 140(3), 118(1),189(2),189(4),190, 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास संभाजीनगर पोलीस करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com