ऋतिक गणकवार, मुंबई:
Mumbai Local Crime: मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई लोकलमध्ये एका प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मालाड रेल्वे स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडली. अलोक सिंग असं मृत् व्यक्तीचं नाव असून किरकोळ भांडणतुन ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लोकलमध्ये प्राध्यापकाची हत्या
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकल ट्रेनमध्ये एका प्राध्यापकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना मुंबईतील मालाड स्टेशनवर घडल्याचे वृत्त आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटविण्यासाठी ते सध्या मालाड रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. आलोक सिंग असे निर्घृण हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
Palghar Crime: भयंकर घटना! आईनेच घेतला पोटच्या लेकीचा जीव; क्षुल्लक कारण समोर, परिसरात खळबळ
क्षुल्लक वादातून भयंकर कृत्य
आलोक सिंग आणि आरोपी दोघेही लोकलमधून प्रवास करत होते. मालाड स्टेशनवर उतरण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून आरोपीने आलोक सिंग याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये आलोक सिंग याचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून रेल्वे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, नालासोपाऱ्यात जन्मदात्या आईनेच मुलीचा जीव घेतल्याची एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. मोठ्या मुलांना का मारते? या रागातून आईने मुलीची डोक्यात वरवंटा घालून निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून अधिक तपास सध्या सुरु आहे.