दिग्दर्शकाने माझे कपडे उतरवले आणि.... अभिनेत्याच्या आरोपांमुळे मल्याळी चित्रपटसृष्टी पुन्हा हादरली

Kerala Film Industry: केरळ चित्रपटसृष्टी ही हेमा कमिटीच्या अहवालामुळे हादरली आहे. इथल्या चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या महिला कलाकारांनी नामवंत अभिनेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेत. शय्यासोबत केल्याशिवाय इथे कामच दिले जात नाही असाही आरोप करण्यात आलाय. आतापर्यंत हे आरोप महिला कलाकारांकडून केले जात होते आता एका पुरुष कलाकारानेही असाच आरोप केला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
फोटो - प्रातिनिधीक
कोच्ची:

Kerala Film Industry: केरळ चित्रपटसृष्टी ही हेमा कमिटीच्या (Justice Hema Committee Report) अहवालामुळे हादरली आहे. इथल्या चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या महिला कलाकारांनी नामवंत अभिनेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेत. शय्यासोबत केल्याशिवाय इथे कामच दिले जात नाही असाही आरोप करण्यात आलाय. आतापर्यंत हे आरोप महिला कलाकारांकडून केले जात होते आता एका पुरुष कलाकारानेही असाच आरोप केला आहे. 

हे ही वाचा: अक्षय शिंदेला केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप नाही

केरळ चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत अभिनेते, दिग्दर्शक, निर्मात्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे केरळी चित्रपटसृष्टी हादरली आहे. अभिनेता दिलीप याने एका अभिनेत्रीवर जबरी लैंगिक अत्याचार केले होते. तिथून या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली होती. अभिनेता दिलीपला अटक करण्यात आली होती, आणि त्याने गुन्ह्यातून सुटण्यासाठी सगळ्या यंत्रणांना प्रभावित करण्याचे प्रयत्न केले होते. त्यात त्याच्या प्रयत्नांना यशही आले होते. मात्र न्यायालयाच्या दट्ट्यामुळे त्याचे प्रयत्न फार यशस्वी होऊ शकले नाहीत.  सदर प्रकरणानंतर अभिनेत्रींनीही पुढे येत त्यांच्यावरील अत्याचारासंदर्भात बोलण्यास सुरुवात केली होती. यामुळे या आरोपांची चौकशी करण्यासाठी हेमा समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामुळे अनेक मोठी नावांचा पर्दाफाश होऊ लागला आहे. एकीकडे अभिनेत्री लैंगिक अत्याचाराचा आरोप करत असताना आता एका पुरुष अभिनेत्यानेही लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. 

Advertisement

हे ही वाचा : 11 वर्षांत 10 पुरुषांविरोधात 10 खटले, महिलेला न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स जारी

एका तरुण अभिनेत्याने रणजित नावाच्या एका दिग्दर्शकावर आरोप केलाय की रणजितने 2012मध्ये त्याला जबरदस्तीने नग्न व्हायला लावले होते. यानंतर रणजितने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला असं या तरुण अभिनेत्याने म्हटलंय.  पोलिसांनी रणजितविरोधात तक्रार नोंदवून घेतली असून तरुण अभिनेत्याने सगळी घटना सविस्तरपणे सांगितली आहे. त्याने म्हटलंय की ऑडिशनच्या नावाखाली त्याला बंगळुरूच्या एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं होतं. त्याला सुरुवातीला वाटलं की आपली खरोखर ऑडिशन घेतली जाणार आहे. मात्र तिथे गेल्यानंतर त्याच्यावर रणजितने लैंगिक अत्याचार केला. रणजितने मला पैसेही देण्याचा प्रयत्न केला असंही तरुण अभिनेत्याने म्हटलं आहे. 

Advertisement

हे ही वाचा : लपंडाव खेळताना चिमुरडी घरात लपली; नराधमाने आत ओढलं

रणजितविरोधातील लैंगिक अत्याचाराची ही दुसरी तक्रार आहे. यापूर्वी एका बंगाली अभिनेत्रीने त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. या अभिनेत्रीने म्हटलंय की 'कोची'मधील एका हॉटेलमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. रणजितने या अभिनेत्रीने लावलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले होते.  रणजितने म्हटलं होतं की त्याने या अभिनेत्रीला 'पालेरी माणिक्यम' च्या ऑडीशनसाठी बोलावले होते. तिचे काम न आवडल्याने तिला आपण परत पाठवून दिले होते, म्हणून ही अभिनेत्री आपल्यावर आरोप करत असल्याचं रणजितने म्हटलं होतं. लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी सात सदस्यांच्या समितीची घोषणा तिथल्या सरकारने केली आहे. ही समिती हेमा समितीने उजेडात आणलेल्या बाबींची छाननी करणार आहे. 

Advertisement

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हेमा समितीच्या अहवालानंतर दिग्दर्शक आणि अभिनेत्यांवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांचे प्रमाण वाढू लागले आहे. पोलिसांत तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मल्याळी प्रसिद्ध अभिनेता आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या मार्क्सवादी पक्षाचा आमदार एम.मुकेश याच्याविरोधात बुधवारी  बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली. एका अभिनेत्रीने ही तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी अभिनेता जयसूर्या आणि मनियनपिला राजू यांच्याविरोधातही अनेक तक्रारी करण्यात आल्या असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हे नोंदवण्यास सुरुवात केल्याचे कळते आहे. 

Topics mentioned in this article