जाहिरात

बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप नाही

अक्षय शिंदे याची आता पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे. एसआयटीने आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यानुसार आता न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरण; आरोपी अक्षय शिंदेला केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप नाही

अमजद खान, कल्याण

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीत तो प्रत्यके प्रश्नांची उत्तरे देत आहे. न्यायालयासमोर अक्षय शिंदेला जेव्हा हजर केले जाते. तो न्यायाधीशाकडून विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देतो. त्याच्या कृत्याने राज्यभरात काय पडसाद उमटले. याची त्याला काही चिंता नाही. त्याला त्याने केलेल्या कृत्याचा काहीही पश्चाताप दिसत नाही. त्याच्या शरीरिक हालचालीतून देखील काही चुकीचे घडले असल्याचे दिसून येत नाही. हे पाहून पोलीसही हैराण आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अक्षय शिंदे याला अटकेनंतर बदलापूरमध्ये मोठे आंदोलन झाले. राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले. अक्षय शिंदे विरोधात पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक झाली. त्याच्या विरोधात शाळेतील दोन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. एका आरोपात गुन्हा दाखल  झाल्यावर त्याची रवानगी जेलमध्ये केली गेली. शिंदे जेलमध्ये असताना एसआयटीने पीडित मुलीपैकी दुसऱ्या मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात एसआयटीने त्याला पुन्हा कल्याण न्यायालयात हजर केले. 

(नक्की वाचा-  CCTV Footage : एका वडापावमुळे गेले 5 लाखांचे दागिने, पुण्यात वृद्ध दाम्पत्यासोबत काय घडलं?)

आरोपी अक्षय शिंदेची त्याची ओळख परेड व्हायची आहे. चार वेळा त्याला न्यायालयात हजर केले आहे. त्याला अटक झाल्यानंतर त्याच्या घराची तोडफोड करण्यात आली. त्याच्या कुटुंबियांना घर सोडून अन्य ठिकाणी आसारा घ्यावा लागला. त्याचे कुंटुंब उद्धवस्त झाले आहे. कुटुंब भितीच्या वातावरणाखाली आहे. या सगळ्याचा अक्षय शिंदेवर कोणताही परिणाम झालेला नाही. त्याला आपल्या कृत्याची कुठेही पश्चाताप झाल्याचेही दिसत नाही, अशी माहिती समोर येत आहे.

याबाबत सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्याला कोर्टात हजर केले जाते. न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नाना तो उत्तरे देतो. त्याच्या मनात केलेल्या कृत्याविषयी कोणतीही भीती नाही. एकदम सरळ भाषेत उत्तरे देतो. त्याच्या हालचालींवरुन अजिबात वाटत नाही की त्याला त्याच्या कृत्याचा  पश्चाताप झालेला आहे. 

(नक्की वाचा - 'माफ कर आई, मी तुझी हत्या केली' लेकानं आईचा खून केला अन्...)

आरोपी अक्षय शिंदेची होणार ओळख परेड

अक्षय शिंदे याची आता पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे. एसआयटीने आरोपीची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यानुसार आता न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे. अक्षय शिंदे हा सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे आता येत्या एक ते दोन दिवसात जेलमध्ये अक्षय शिंदे याची पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे. अत्याचार प्रकरणात कोणतीही त्रुटी राहू नये, म्हणून ही ओळख परेड करण्यात येणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com