मालेगावमध्ये चड्डी बनियान गँगचा पुन्हा धुमाकूळ, दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद

या चोरीचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यात ही गँग चोरी करत असताना दिसत आहे. चड्डी बनियान गँगच्या या चोरी सत्राने नागरिक व व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नाशिक:

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असताना नाशिकच्या नाशिकच्या मालेगावमध्ये चड्डी बनियान गँगचा धुमाकूळ सुरू आहे.  गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास मनमाड चौफुलीवरील खते विक्री, हार्डवेअर, विजेचा पंप, पाणी जार असे सहा दुकान चड्डी बनियान गँगने फोडली आहेत. या चोरीतून लाखोंचा ऐवज लंपास केला गेला आहे. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही चोरी चड्डी बनियान गँगने केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या चोरीचा व्हीडिओ समोर आला आहे. त्यात ही  गँग चोरी करत असताना दिसत आहे. चड्डी बनियान गँगच्या या चोरी सत्राने नागरिक व व्यापाऱ्यांनी धसका घेतला आहे. या चड्डी बनियान गँगचा बंदोबस् करावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. पोलीसही यामुळे आता सतर्क झाले आहेत. या गँगचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीसांनी पुढाकार घेतला आहे. 

ट्रेडिंग बातमी - कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण बाजी मारणार? महाडिक विरुद्ध पाटील सामना रंगणार

काही दिवसापूर्वी या टोळीने घरात आणि कॉलेजमध्ये घुसून सोने आणि रोख रक्कम चोरली होती. ऐवढेच नाही तर त्यांनी घरातली केळीही चोरली होती. याचोरट्यांनी जवळपास 70 ग्रॅम सोनं आणि 5 लाख रुपये चोरले होते. केळी चोरतानाही ते सीसीटीव्हीत दिसले होते. ही टोळी चोरी करताना तीन जण घरात घुसले होते. तर एक जण पाहारा देताना दिसत होता. 

ट्रेंडिंग बातमी - आरोग्य मंत्र्यांसाठी परांड्याची वाट बिकट? करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार?

एकीकडे चड्डी बनियन गँगचा धुमाकूळ सुरू असताना दुसरीकडे शहरात गाऊन गँगही सक्रीय झाली आहे. त्यामुळे पोलीसांसमोर या दोही गँगना आवर घालण्याचे आव्हान असणार आहे.या दोन्ही गँग सक्रीय झाल्याने नागरिकांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण आहे. खास करून व्यापारी वर्ग या गँगमुळे चांगलाच धास्तावला आहे. त्यांनी या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. 

Advertisement