Bhandara News : पैशांसाठी फिल्मी स्टाईल हत्या, मित्रानेच मित्राचा काढला काटा

घटनास्थळावर उपस्थित काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच लाखांदूर पोलिसांना माहिती दिली.

जाहिरात
Read Time: 1 min

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली (बु) गावातील शेतशिवारात पैशांच्या वादातून एकाने दुसऱ्याला तळ्यात बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेत विरली (बु) येथील नरेश दुनेदार (४५) याचा मृत्यू झाला आहे. हत्येप्रकरणात नारायण मेश्राम (४२) या आरोपीला लाखांदूर पोलिसांनी अटक केली आहे.

मृतक व आरोपी हे दोघेही दुपारच्या सुमारास दारूच्या नशेत स्थानिक तळ्यात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्याचदरम्यान आरोपी नारायण मेश्राम याने नरेश दुनेदारवर पैशांची चोरी केल्याचा आरोप केला. या आरोपावरून दोघांमध्ये जोरदार वाद आणि मारहाण झाली. या भांडणात संतापलेल्या नारायण मेश्रामने नरेशला तळ्यात ओढत नेऊन पाण्यात बुडवून ठार केल्याचे उघड झाले आहे.

नक्की वाचा - Ambernath News: डॉक्टर पत्नीच्या डोक्यात पतीने खलबत्ता घातला, हल्ल्यामागचे कारण ऐकून धक्का बसेल

घटनास्थळावर उपस्थित काही नागरिकांनी हा प्रकार पाहताच लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पवनीचे उपविभागीय पोलीस अधिकारी लाखांदूरचे ठाणेदार यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.आरोपीला ताब्यात घेऊन हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाखांदूर पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. परिसरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article