संतापजनक! अभिनेत्रीने अश्लील मेसेज पाठवणाऱ्याला केले ब्लॉक, दुसऱ्या अकाउंटवरून गुप्तांगाचा Video पाठवला, मग...

Bengaluru Actress News: वारंवार समज दिल्यानंतरही आरोपीने अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवून त्रास देणे सुरू ठेवले, अखेर अभिनेत्रीने उचलले हे पाऊल...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Bengaluru Actress News: टीव्ही अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवणारा गजाआड"
Canva

Bengaluru News: बंगळुरू शहरातील एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला सोशल मीडियावर अश्लील मेसेज आणि अश्लील व्हिडीओ पाठवून लैंगिक छळ केल्याच्या आरोपांतर्गत पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलीय. अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. घडल्या प्रकाराबाबत अभिनेत्रीने सांगितले की, आरोपी तिला वारंवार अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवता होता. या त्रासाला कंटाळून पोलिसात धाव घ्यावी लागली. अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

अभिनेत्रीला अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवले | TV Actor Receives Videos Of Private Parts Obscene Texts

पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये टीव्ही अभिनेत्रीने म्हटलंय की, जवळपास तीन महिन्यांपूर्वी नवीनज नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन फ्रेंड रीक्वेस्ट आली होती. पण अभिनेत्रीने ती स्वीकारली नव्हती. तर आरोपीने मेसेंजरच्या माध्यमातून अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. यानंतर अभिनेत्रीने त्याला ब्लॉक केले. कहर म्हणजे आरोपीने आणखी एक नवीन अकाउंट तयार केले. याद्वारे त्याने अभिनेत्रीला स्वतःच्या गुप्तांगाचा व्हिडीओ पाठवला. वारंवार हटकूनही त्याने अश्लील मेसेज आणि व्हिडीओ पाठवण्याचा संतापजनक प्रकार सुरूच ठेवला. 

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत

आरोपीने 1 नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीला पुन्हा मेसेज पाठवला त्यावेळेस तिने आरोपीला एका ठिकाणी भेटण्यास बोलावले आणि अश्लील मेसेज पाठवणं थांबवण्यास सांगितले. पण त्याने अभिनेत्रीच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन तिच्याशी गैरवर्तन केले. महिलेने घडला प्रकार पोलिसांना सांगितला, त्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीविरोधात लैंगिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडालीय.

(नक्की वाचा: Pimpri Chinchwad News: शिक्षकच झाला भक्षक! विद्यार्थिनीशी गैरकृत्य, लिफ्टमध्ये नेलं अन्...)