सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:
Pimpri Chinchwad Crime: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाले आहे. डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचारातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. अशातच पिंपरी चिंचवडमधून एक संतापजनक बातमी समोर आली असून एका शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे.
गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा!
गुरु- शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पिंपरी चिंचवडमधून समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये उच्च शिक्षणाच्या पूर्वपरीक्षा क्लासेसमध्ये एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेतन चव्हाण (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे. या आरोपी शिक्षकाने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना जादा क्लासेसच्या नावाखाली बोलावले.
Pune News: चिकन दुकानात सुरू होतं भलतंच काम; पुणे पोलिसांची धडक कारवाई
त्यानंतर एका मैत्रिणीला दुसऱ्या विषयाचा पेपर सोडवण्यासाठी चौथ्या मजल्यावर पाठवले. दुसऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला आहे. पीडित मुलीने विरोध दर्शविला असता, आरोपीने तिला डोळे मोठे करून दम दिला आणि पुन्हा एकदा लिफ्टमधून खाली येताना तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्या मागे लागला, मात्र मुलीने मावशीकडे जायचे असल्याचे सांगून कशीतरी आपली सुटका करून घेतली.
घरी पोहोचल्यावर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर, वडिलांनी आणि मुलीने निगडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निगडी पोलिसांनी आरोपी चेतन चव्हाण याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असून नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world