Maharashtra Crime: 'फोन नंबर ब्लॉक केला..', तरुणाची सटकली, एकतर्फी प्रेमातून नृत्यांगणावर कोयत्याने केला हल्ला

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात सर्वात भयंकर घटना घडली आहे.'फोनवर बोलत नाहीस नंबर ब्लॉक का केला'असं विचारत संतापलेल्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून नृत्यांगणा असलेल्या मैत्रिणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Jamkhed Crime News

प्रसाद शिंदे, प्रतिनिधी

Ahilyanagar Crime News : 

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात सर्वात भयंकर घटना घडली आहे.'फोनवर बोलत नाहीस नंबर ब्लॉक का केला'असं विचारत संतापलेल्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून नृत्यांगणा असलेल्या मैत्रिणीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.पीडित महिला पेशाने नृत्यांगणा असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राहुल अशोक कचरे असं या आरोपीचे नाव असून तो बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील रहिवासी आहे. आरोपी विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

त्या नृत्यांगणाने केली होती आत्महत्या..

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच जामखेड येथील एका कला केंद्रातील नृत्यांगणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता जामखेड शहरातील तपनेश्वर भागात राहणाऱ्या महिलेवर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटली, 'या' निकालाची राज्यभर चर्चा, गड आला पण सिंह गेला..

फोनवर बोलत नाहीस नंबर ब्लॉक का केला, या रागातून आरोपीने नृत्यांगनावर मध्यरात्रीच्या सुमारास कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर आरोपी फरार झाला. या गंभीर प्रकरणी जामखेड पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Video : पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांची पकडली कॉलर, काय घडलं?