जाहिरात

Video : पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांची पकडली कॉलर, काय घडलं?

पनवेलमध्ये निवडणूक निकाल प्रक्रियेला गालबोट लागल्याचं समजते आहे. पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

Video : पनवेल मतदान केंद्राबाहेर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांची पकडली कॉलर, काय घडलं?
Bjp Vs Police Panvel Video
मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी 

Panvel Police And Bjp Leaders Video : राज्यात 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यभरात निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरू असून विजयी उमेदवार गुलाल उधळून जल्लोष करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच पनवेलमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एका भाजप कार्यकर्त्याने पोलिसाची कॉलर पकडल्याचं सांगितलं जात आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु, पनवेलमध्ये निवडणूक निकाल प्रक्रियेला गालबोट लागल्याचं समजते आहे. पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संबंधित भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कार्यकर्ता नेमका कोण आहे आणि त्याने पोलिसांची कॉलर कशासाठी पकडली, याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून केला जात आहे. 

नक्की वाचा >> Zilla Parishad Election Result 2026: सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या निर्मला नवले जिंकल्या का हरल्या ?

मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उचलणे किंवा त्यांचा अवमान करणे कितपत योग्य आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे कृत्य होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आज राज्यभरात मतमोजणी प्रक्रिया सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतही कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.असे असतानाही पनवेलमध्ये हा प्रकार घडल्याने पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, पनवेल शहर पोलिसांनी संबंधित भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून, पुढील कायदेशीर कारवाई काय केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com