Badlapur News: बदलापूरमध्ये भयंकर घटना! तरुणाचा आईवर जीवघेणा हल्ला, पत्नीच्या रेकॉर्डिंगचं कनेक्शन आलं समोर

Badlapur News Today : बदलापूरमध्ये एक तरुणाने आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Badlapur Crime News Today

Badlapur Crime News Today : बदलापूरमध्ये एक तरुणाने आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आईवर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झाला होता.उल्हासनगर गुन्हे शाखेने या फरार आरोपीला अखेर अटक केली आहे. मिलिंद व्यापारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमध्ये आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी आरोपी मिलिंदला उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली आहे. आई आणि त्यांचा नातू नंदा व्यापारी हॉलमध्ये झोपेत असताना त्यांचा मुलगा मिलिंद नारायण व्यापारी त्यांच्याजवळ आला. पत्नीसोबत झालेल्या संभाषणाचे मोबाईलमधील रेकॉर्डिंग कोणी डिलीट केले,असं विचारत त्याने त्याच्या आईला झोपेतून उठवलं आणि तिच्यासोबत वाद घातला. त्याने आईला शिवीगाळ करत तिला मारहाण केली. 

Advertisement

नक्की वाचा >> अंबरनाथमध्ये तुफान राडा! शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर, रहिवाशांकडून दगडफेक अन् रास्ता रोको, कारण काय?

आरोपी मिलिंद फरार झाला होता, पण त्यानंतर..

आरोपी मिलिंदने कपड्याचा बोळा करून तिच्या तोंडात कोंबला आणि एका हाताने त्याच्या आईचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपी मिलिंद व्यापारी हा फरार झाला होता.त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेतील पोलीस शिपाई रामदास उगले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. बदलापूर पूर्व पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नक्की वाचा >> Raigad News: लग्नात बस्ता, हळदीला मटण आणि दारू बंद! रायगडच्या 'या' गावातील महिला मंडळाचा क्रांतिकारी निर्णय