यूपीचा 'लखोबा लोखंडे', लग्नाचं आमिष दाखवून जवळपास न्यायाधीशासह 50 महिलांना फसवलं

आरोपीने आतापर्यंत 50 हून अधिक महिलांची आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील एका महिला न्यायाधीशाचा देखील समावेश आहे. आरोपी भारत सरकारमधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून महिलांना फसवत असे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mukeem Khan told the cops he used to target Muslim women for marriage.

लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मॅट्रिमोनिअल वेबसाईटच्या माध्यमातून हा व्यक्ती महिलांशी मैत्री करून पैसे उकळत असे. अटक केलेल्या आरोपीने आतापर्यंत 50 हून अधिक महिलांची आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील एका महिला न्यायाधीशाचा देखील समावेश आहे. आरोपी भारत सरकारमधील वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून महिलांना फसवत असे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिल्ली क्राइम ब्रँचचे डीसीपी संजय सेन यांनी याबाबत सविस्तर सांगितलं की, गुन्हे शाखेच्या खंडणी व अपहरण विरोधी पथकाने आरोपी मुकीम अयुब खान याला निजामुद्दीन रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने देशभरातील 50 हून अधिक महिलांची फसवणूक केली आहे. यातील एक महिला उत्तर प्रदेशमध्ये न्यायाधीश आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगडचा रहिवासी असलेल्या मुकीम खानचे 2014 मध्ये त्यांचे लग्न झाले आहे आणि त्याला तीन मुले देखील आहेत.

(नक्की वाचा -  रंगावरून हिणवलं, पैशांची मागणी; सततच्या छळाला कंटाळून सहा महिन्यातच नवविवाहितेनं जीवन संपवलं)

पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याने काही मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर अनेक बनावट आयडी बनवले आहेत. त्याद्वारे तो महिलांना लग्नाचे आमिष दाखवायचा. भारत सरकारमध्ये तो वरिष्ठ अधिकारी असल्याचं सर्व महिलांना सांगत असे. हाय प्रोफाइल मुस्लीम अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिला हे त्याचे टार्गेट असायच्या. टार्गेट ठरवल्यानंतर तो आपला मोबाईल नंबर अशा महिलांसोबत शेअर करत असे. त्यानंतर आपल्या बोलण्याने त्यांना अडकवत असे.

(नक्की वाचा -  मोठा आवाज, लाल रंगाचा प्रकाश... आकाशातून पडलेल्या उपकरणाची येवला परिसरात चर्चा)

महिलांचा विश्वास जिंकण्यासाठी आरोपी महिलांना सांगायचा की, त्याची पत्नी मरण पावली. त्यानंतर तो आपल्या एकुलत्या एक मुलीचा सांभाळ करू शकत नाही. पत्नी आणि मुलीचे फोटोही तो महिलांना दाखवत असे. एकदा त्याने महिलांचा विश्वास जिंकला की, तो त्यांच्या कुटुंबीयांना भेटायचा आणि लग्नाबद्दल बोलायचा. मग तो लग्नाची तारीख ठरवायचा. त्यानंतर लग्नासाठी किंवा इतर खर्चासाठी हॉल बुक करण्यासाठी पैसे मागायचा. पैसे मिळाले की मग तो गायब व्हायचा.

Advertisement

Topics mentioned in this article