कर्नाटकमधून मन सुन्न करणारी एक घटना समोर येत आहे. हुबळी येथे एका 20 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रेमात नकार दिला म्हणून तरुणाने तरुणीची हत्या केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंजली असं 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे. तर गिरीश सावंत असं 21 वर्षीय तरुणांचं नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अंजली बुधवारी सकाळी आपल्या घरात झोपली होती. त्यावेळी गिरीश तिच्या घरात शिरला आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले.
(नक्की वाचा- दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून बायकोची हत्या; आरोपी पती फरार)
गिरीशचं अंजलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र अंजलीचा यासाठी नकार होता. मात्र हाच नकार गिरीशला पचवणे कठीण जात होते. याच रागातून गिरीशने अंजलीची हत्या केली. आरोपी गिरीश सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
(वाचा - पैशासाठी मूर्तीकार बनला चोर, कल्याण रेल्वे पोलिसांनी केली अटक)
हुबळी धारवाडचे पोलीस अधीक्षक गोपाल बायकोड यांनी म्हटलं की, वीरपुर्रा ओनी गावाजवळ अंजली नावाच्या मुलीची हत्या झाल्याची माहिती मिळाली होती. एका तरुणाने घरात शिरुन अंजलीवर चाकू हल्ला करत तिची हत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने तरुणीची हत्या का केली, यामागच्या कारणाचा देखील पोलीस शोध घेत आहेत.